घरमुंबईपावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांची सत्ताधाऱ्यांविरोधात बॅनरबाजी

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांची सत्ताधाऱ्यांविरोधात बॅनरबाजी

Subscribe

बॅनर बाजी करत आणि घोषणा देत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्ला बोल केला. पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असूनही विरोधकांच्या घोषणा सुरूच आहेत.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी 17 ऑगस्ट 2022 रोजी सुरु झाले. राज्यात सत्ता बदल झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे – फडणवीस(shinde – fadanvis) सरकारची सत्ता स्थापन झाली. मंत्रिमंडळाचा विस्तार ते पावसाळी अधिवेश या दरम्यान राज्यात अनेक घडामोडी घडल्या विरोधी बाकावर बसलेल्या नेतेमंडळींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लबोल केला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विविध मुद्दे समोर ठेवून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली. बॅनर बाजी करत आणि घोषणा देत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्ला बोल केला. पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असूनही विरोधकांच्या घोषणा सुरूच आहेत.

1) आज 22 ऑगस्ट 2022 पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे.

- Advertisement -

2) अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशीसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायाला मिळालं.

3)  पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके…ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या.

- Advertisement -

4) ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… गद्दारांचं सरकार हाय हाय… असं म्हणत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.

5) आले रे आले गद्दार आले… अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

6) तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

7) विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 Vidhan Bhavan 8) अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी ईडी सरकारला धारेवर धरण्याचे काम सुरू केले असून हे आंदोलनातून दाखवून दिले आहे.

9) पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला बोल केला.

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -