तुम्ही आता महाराष्ट्राचे नाथ आहात, कोणा एकाचे नाही; छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर फटकेबाजी

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटाच लावला आहे. आतापर्यंत अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली असून, यामध्ये नगराध्यक्ष तसेच सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णयाचा समावेश आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटाच लावला आहे. आतापर्यंत अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली असून, यामध्ये नगराध्यक्ष तसेच सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णयाचा समावेश आहे. या निर्णयावरून विधानसभेमध्ये विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत खोचक टोलेही लगावले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयावरून सरकावर सडकून टीका केली. तसेच या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली. तसेच, “तुमचे निर्णय वारंवार का बदलत आहेत. तुम्ही एकनाथ राव आहात. तुम्ही आता महाराष्ट्राचे नाथ आहात. तुम्ही कोणा एकाचे नाथ नाही”, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले. (ncp leader chagan bhujbal slams cm eknath shinde)

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भुमिका वारंवार का बदलते आहे?, मी अनाकालनी आहे. त्यांची भुमिका ठाम का नाही. त्यांनीच केलेले निर्णय तेच बदलत आहे. याआधी त्यांनी केले निर्णय सर्व सभागृहान मान्य केले होते. त्यावेळी आम्ही त्यांनी अनेकदा निर्णयांबाबत पुर्नविचार करण्याबाबत सांगत होतो. मात्र त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

“तुम्ही आता मुख्यमंत्री आहात, मग आता तुमच्यावर कसला दबाव आहे. तुमच्यावर कोण दबाव आणत आहे. तुम्ही 13 कोटी लोकांच्या मनाचे तुम्ही स्वामी होणार आहात. तुम्हाला संधी मिळालेली आहे. यासाठी तुम्हाला योग्य निर्णय घ्यावे लागतील. काही महिन्यांपूर्वी तुम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो, आणि कालांतराने तोच तुम्हाला अयोग्य वाटतो. तुमचे निर्णय वारंवार का बदलत आहेत. तुम्ही एकनाथ राव आहात. तुम्ही आता महाराष्ट्राचे नाथ आहात. तुम्ही कोणा एकाचे नाथ नाही, महाराष्ट्राचे नाथ आहात.

आपल्या देशात प्रेसिडेन्शिअल सिस्टीम नाही, ती अमेरिकेत आहे. अमेरिकेतील ही सिस्टीम आपल्या देशात आणायची का, याबाबात चर्चा होत असते. पण आतापर्यंत आपल्या देशाने ही सिस्टीम नाकारली आहे. आपली पूर्वीची सिस्टीम वापरली जात आहे. तसेच, संपूर्ण देशभराता ही सिस्टीम पाळली जात आहे.


हेही वाचा – 2017 च्या वॉर्ड रचनेनुसार मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याच्या निर्णयाला SCची स्थगिती