घरमुंबईमासेमारी करणारी बोट पाण्यात बुडाली; एकजण बेपत्ता

मासेमारी करणारी बोट पाण्यात बुडाली; एकजण बेपत्ता

Subscribe

बेपत्ता झालेला एक मच्छिमार आणि अपघातग्रस्त बोट लवकरात लवकर मिळावी यासाठी बचाव दलाचे कार्यकर्ते तपास करत आहेत.

आज सकाळी मासेमारीसाठी वसईच्या समुद्रात गेलेली एक बोट पाण्यात बुडाली. अर्नाळा ते डहाणूदरनम्यान मासेमारी करणाऱ्या या बोटीला हा अपघात झाला. या अपघातामध्ये बोटीवरील एक माणूस बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय अपघातग्रस्त बोटही अद्याप मिळालेली नाही. हा अपघात नेमका कशामुळे घडला याचं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही. कोस्टल गार्ड पथकाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी तात्काळ बोट बुडालेल्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, बोटीतील २ ते ३ मच्छिमार सुखरुप असून १ मच्छिमार बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली. मात्र, बोट समुद्रात नेमकी कुठे अाहे याचा शोध न लागल्यामुळे तसंच बचावलेल्या मच्छिमारांशी संपर्क तुटल्यामुळे कोस्टल गार्ड्सना बचावकार्यात अडथळा येत आहे. दरम्यान, या घटनेला १ ते २ तास उलटले असून, आतापर्यंत मच्छिमारांना मदत मिळाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

- Advertisement -

दरम्यान, अपघातानंतर बोटीवरुन बेपत्ता झालेला एक मच्छिमार आणि अपघातग्रस्त बोट लवकरात लवकर मिळावी यासाठी बचाव दलाचे कार्यकर्ते तपास करत आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना परिस्थितीचा नेमका अंदाज येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.


वाचा: पुरुषाला नपुंसक म्हणणं ही त्याची बदनामी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -