Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई काळबादेवीत इमारतीचा भाग कोसळून एकजण जखमी

काळबादेवीत इमारतीचा भाग कोसळून एकजण जखमी

Subscribe

काळबादेवी, वर्धमान जंक्शन येथील तळमजला अधिक चार मजली इमारतीच्या नूतनिकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इमारतीचा काही भाग अचानक

काळबादेवी, वर्धमान जंक्शन येथील तळमजला अधिक चार मजली इमारतीच्या नूतनिकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून त्याला घरी पाठविण्यात आले आहे.

प्राप्त महितीनुसार, काळबादेवी, वर्धमान जंक्शन, बँक ऑफ इंडिया जवळ, एल टी मार्ग, लोहार चाळ येघे तळमजला अधिक चार मजली इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला.

- Advertisement -

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटनेत एक व्यक्ती जखमी झाला. त्याला स्थानिक नागरिकांनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचरासाठी नेले. तेथे त्याच्यावर डॉक्टरांनी तात्काळ उपचार केल्याने त्याला बरे वाटले. त्यामुळे त्याला घरी पाठविण्यात आले. मात्र त्याचे नाव समजू शकले नाही.

दरम्यान, ही इमारत दुर्घटना का व कशी काय घडली, इमारतीच्या नुतनीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली होती का, त्यात काही दिरंगाई झाली का. इमारतीचा भाग नेमका का व कसा काय कोसळला याबाबत स्थानिक पोलीस, पालिका यंत्रणा, अग्निशमन दल हे सखोल तपास करीत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Good News! मार्चमध्ये नोकरभरतीत 6 टक्क्यांची वाढ; सर्वाधिक नोकऱ्या मुंबईत

- Advertisment -