Good News! मार्चमध्ये नोकरभरतीत 6 टक्क्यांची वाढ; सर्वाधिक नोकऱ्या मुंबईत

देशात कोरोनचा प्रादुर्भावन ओसरल्यानंतर आर्थिक क्षेत्रात चांगलीच तेजी आली. कोरोनाच्या काळात अनेकांना रोजगारावर पाणी सोडावं लागलं होतं. परंतू, निर्बंध शिथील झाल्यानंतर नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासही सुरूवात झाली.

Income Tax Recruitment 2022 Tax Assistant, MTS Posts Apply Online
IT Recruitment 2022: सरकारी नोकरी शोधताय, तर आयकर विभागाने आणली सुवर्णसंधी, जाणून घ्या

देशात कोरोनचा प्रादुर्भावन ओसरल्यानंतर आर्थिक क्षेत्रात चांगलीच तेजी आली. कोरोनाच्या काळात अनेकांना रोजगारावर पाणी सोडावं लागलं होतं. परंतू, निर्बंध शिथील झाल्यानंतर नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासही सुरूवात झाली. एका अहवालानुसार, अनेक कंपन्यांनी त्यांच्या नोकरभरतीमध्ये वाढ केली असून, मार्च महिन्यात वार्षिक आधारावर रोजगाराच्या दरात 6 टक्के वाढ झाली आहे.

मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्स नावाच्या कंपनीने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात 13 शहरांमधील कंपन्यांच्या भर्ती डेटाचे विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणानुसार, ऑनलाइन नोकरभरतीचा मागोवा घेण्यात आला. त्यानुसार, यामध्ये एका वर्षापूर्वीच्या तुलनेत यंदा 6 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. शिवाय, 13 शहरांमधील महानगरांनी वार्षिक आधारावर रोजगाराच्या दरात दुहेरी अंकी वाढ नोंदवली आहे.

मुंबईत सर्वाधिक नोकरभरती

एमएईच्या अहवालानुसार, नोकरभरतीच्या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर आहे. मुंबईत मार्च महिन्यात नोकरभरतीचा दर 21 टक्क्यांनी जास्त होता. म्हणजेच नोकरीची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुंबई उदयास आली. त्यानंतर 20 टक्क्यांच्या वाढीसह कोईम्बतूर आणि 16 टक्क्यांच्या वाढीसह चेन्नई आणि हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये इतकी वाढ

या अहवालात, बेंगळुरूमध्ये ऑनलाइन नोकरभरती क्रियाकलाप 15 टक्के अधिक नोंदवलं गेलं आहे. तर कोलकाता आणि दिल्ली-एनसीआरमध्ये ही वाढ प्रत्येकी 13 टक्के होती. यानंतर पुण्याचा क्रमांक येत असून पुण्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय इतर मोठ्या शहरांमध्येही कंपन्यांकडून भरती प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे.

‘या’ क्षेत्रांमध्ये अधिक रोजगार मिळवा

मार्च 2022 च्या आकडेवारीनुसार, बँकिंग/वित्तीय सेवा आणि विमा कंपन्यांमध्ये भरतीसाठी सर्वाधिक मागणी दिसून आली. यामध्ये, भरतीचे प्रमाण 37 टक्क्यांनी जास्त नोंदवले गेले. यानंतर दूरसंचार/ISP मध्ये 17 टक्के सुधारणा झाली आणि उत्पादन आणि उत्पादन कंपन्यांमधील भर्ती क्रियाकलापांमध्ये 16 टक्के वाढ झाली.

‘या’ क्षेत्रात सुधारणा

या क्षेत्रांव्यतिरिक्त, कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल सेक्टरमध्येही बऱ्याच काळानंतर सुधारणा झाली आहे. या क्षेत्रात लोकांना रोजगार मिळू लागला आहे. ऑनलाइन भरती डेटाच्या आधारे, मार्च महिन्यात या क्षेत्राने वार्षिक 11 टक्के सुधारणा दर्शविली आहे. दुसरीकडे, अभियांत्रिकी, बांधकाम आणि लोह/पोलाद संबंधित कंपन्यांमधील भरती 20 टक्क्यांनी कमी झाली आहे.


हेही वाचा – “मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही”; एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची सुसाईड नोट लिहित आत्महत्या