घरमुंबईऑनलाईन बाजारात सोने चकाकले

ऑनलाईन बाजारात सोने चकाकले

Subscribe

लॉकडाऊन असूनही अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोन्याला झळाळी खरेदीत ८ टक्क्यांची वाढ

लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला सराफा बाजार अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर गजबजेल, असा अंदाज होता. पण लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने ही सोनेखरेदी आता सराफा बाजाराऐवजी ऑनलाईन सुरू झाली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोनेखरेदी करण्यासाठी लोकांनी ऑनलाईन पोर्टल्सवर गर्दी केली आहे. शनिवारी ऑनलाईन सोनेखरेदीच्या प्रमाणात ८ टक्क्यांची वाढ झाली होती.

लॉकडाऊनचा परिणाम सराफा बाजारावरही झाला आहे. सोने-चांदी विक्री करणारी सगळी दुकानं बंद असल्याने बाजारात मंदी आहे. त्यातच सोन्या-चांदीच्या दरांमध्येही सातत्याने चढउतार होत आहेत. पण, असं असतानाही ऑनलाईन सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. लोकांनी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे.

- Advertisement -

ऑगमाँट ही कंपनी ऑनलाईन सोने-चांदी खरेदीच्या क्षेत्रात काम करते. जवळपास २ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असलेल्या या कंपनीच्या विक्रीत गेल्या महिन्याभरात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याचे दागिने आणि सोने याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोनेखरेदी करण्यावर लोकांचा भर असतो. नेमक्या याच काळात ऑनलाईन सोनेव्यापार तेजीत आला आहे, असे निरीक्षण ऑगमाँट कंपनीचे संचालक सचिन कोठारी यांनी नोंदवले.

भारतात ग्राहक चार ते पाच हजार रुपयांच्या किमतीची सोन्याची नाणी किंवा बिस्किटं घेण्याला पसंती देतात. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सोने व्यापार थंडावला होता. पण, अक्षय तृतीया जवळ आल्यापासून ऑनलाईन सोनेखरेदीने जोर पकडला आहे. ही सोनेखरेदी ८ टक्क्यांनी वाढली आहे, असेही कोठारी यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -