घरमुंबईवृक्ष जपले तरच प्राणवायुंचे प्रमाण वाढेल-महापौर

वृक्ष जपले तरच प्राणवायुंचे प्रमाण वाढेल-महापौर

Subscribe

वृक्ष जपले तरच प्राणवायुंचे प्रमाण वाढून मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे वाढलेले प्रमाण कमी करून ऑक्सीजनचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर मोठ्याप्रमाणात उद्यानांची निर्मिती करण्यावर भर दिला जात असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) येथे महापालिका व वृक्षप्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने २४वे झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यानविद्या विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत खुले राहणार्‍या या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलल होते. दरवर्षी या प्रदर्शनात नाविन्य व कल्पकता असते. वृक्षतोड कमी करून पर्यावरणाचा होणारा र्‍हास टाळण्यासाठी य प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईकरांना झाडे,फुले,फळे आदींचे आकर्षण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आवश्यक असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

या कार्यक्रमात आमदार सरदार तारासिंह, महापालिका आयुक्त अजोय मेहता, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हाजी हलीम शेख, स्थापत्य समिती अध्यक्ष शहर , अरुंधती दुधवडकर, विधी समिती अध्यक्ष सुवर्णा कारंजे, अतिरिक्त विजय सिंघल, सहआयुक्त डॉ. किशोर क्षिरसागर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -