घरमुंबईपालघर पोलिसांनी वाचवले चिमुरड्यांसह तिघांचे प्राण

पालघर पोलिसांनी वाचवले चिमुरड्यांसह तिघांचे प्राण

Subscribe

दुर्मिळ गटाचे रक्त देऊन पालघर पोलिसांनी दोन चिमुरड्यांसह तीन जणांचे प्राण वाचवून नवा आदर्श निर्माण केला आहे. सर्व सामान्य जनतेला त्रास देणारे, धनदांडग्यांचा संरक्षण देणारे अशा अनेक उपमा देवून पोलिसांना ट्रोल केले जाते. मात्र, खाकी वर्दीतही माणूसही दडली असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.

त्यामुळे मलीन झालेली पोलिसांची प्रतिमा सुधारू लागली आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. पालघर पोलिसांनी आणि त्यांच्या पत्नीने रक्तदान करून दोन चिमुकल्यांसह तिघांचे प्राण वाचवले आहेत. पालघरच्या कांता हॉस्पीटलमध्ये सावरे गावातील संस्कृती बर्डे (6) आणि विक्रमगड येथील अनिल हाडळ (9) ही दोन मुले उपचार घेत होती. त्यांना ओ पॉझीटीव्ह रक्ताची नितांत गरज होती. या हॉस्पीटलचे डॉ.चव्हाण यांनी त्यासाठी फोन करून पालघर पोलिसांची मदत मागितली. त्यावेळी पालघर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार योगेश देशमुख यांनी ही माहिती पोलीस ग्रुपवर पाठवली.

- Advertisement -

तसेच आपल्या पत्नीचा रक्तगट ओ असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पत्नीला हॉस्पीटलमध्ये बोलवून घेतले. एका कर्तव्यदक्ष पोलिसाची पत्नी असलेल्या सुनिता देशमुख यांनीही समाजकर्तव्य मानून आपले रक्त दिले. त्याचवेळी पोलीस शिपाई शिवा राठोड यांनीही आपले रक्त या चिमुरड्यांसाठी दान केले. दरम्यान, परवेज गौरी या अन्य एका रुग्णाला बी पॉझीटीव्ह रक्ताची गरज असल्याचे समजल्यावर पोलीस योगेश देशमुख यांनी ताबडतोब रक्तदान केले. राठोड, देशमुख हे पोलीस आणि देशमुख यांच्या पत्नीने अशाप्रकारे सामाजिक बांधलकी जपत नवा आदर्श निर्माण केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -