घरताज्या घडामोडीप्रीतम मुंडेंना डावलले, राजीनामा सत्र सुरूच, आता सभापती आणि जिल्हा उपाध्यक्षांचाही राजीनामा

प्रीतम मुंडेंना डावलले, राजीनामा सत्र सुरूच, आता सभापती आणि जिल्हा उपाध्यक्षांचाही राजीनामा

Subscribe

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोलले जात होते. याचपार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत आपण पक्षासाठी काय केले हे सांगत आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केलं खंर. पण तरीही मुंडे समर्थकांमध्ये नाराजी असून शनिवारी बीड जिल्हातील ११ तालुका अध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता अहमदनगरच्या पार्थर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्षांनीही राजीनामे दिले आहेत.

यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश होईल अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत केंद्रीय मंत्रिमंडळात डॉक्टर भागवत कराड यांना स्थान देण्यात आले. यामुळे मुंडेना संपवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात सुरू झाली आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षासाठी मुंडे कुटुबीयांच योगदान किती आहे हे स्पष्ट केलं. यावेळी त्या भावनाविवशही झाल्या . त्यानंतर बीडमध्ये राजीनामा सत्रच सुरू झाले. पक्षातील मुंडे समर्थकांनी राजीनामे देत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पार्थडी पंचायत समितीच्या भाजपाच्या सभापती सुनीता दौंड आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनीदेखील राजीनामे दिले. यामुळे येत्या काही दिवसात आणखी काही मुंडे समर्थक राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -