घरमुंबईपरमबीर सिंह भ्रष्टाचार प्रकरण , बार मालकाविरुद्ध लूक आऊट नोटीस

परमबीर सिंह भ्रष्टाचार प्रकरण , बार मालकाविरुद्ध लूक आऊट नोटीस

Subscribe

परमबीर सिंह यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले, तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केलेल्या खुल्या विभागीय चौकशीप्रकरणी दक्षिण मुंबईतील एका बार मालकाविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. लवकरच या बारमालकाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार आहे.

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. याच दरम्यान परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध शहरातील बार, हॉटेल्स आणि ऑर्केस्ट्रा मालकाकडून दरमहा शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती. या आरोपानंतर त्यांच्याविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणाहून तक्रारीचे सत्र सुरू झाले होते.

- Advertisement -

परमबीर सिंह यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले, तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली होती. मुंबई आणि ठाणे शहराचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी अनेकांना गुन्ह्यांत अटक तसेच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती. याबाबत काही बुकींसह बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे. या सर्व तक्रारीच्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परमबीर सिंह यांची खुली विभागीय चौकशी सुरू केली आहे. अनुप डांगरे यांनी त्यांच्या अर्जात केलेल्या आरोपानंतर आता या अधिकार्‍यांनी दक्षिण मुंबईतील एका बार मालकाचा शोध घेत आहेत, तो सापडत नसल्याने त्याच्याविरुद्ध आता लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -