घरमुंबईफी वाढीवरून पालक आक्रमक; शाळेतच पालकांचे मुंडन

फी वाढीवरून पालक आक्रमक; शाळेतच पालकांचे मुंडन

Subscribe

मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये फी वाढीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोमवारी दहिसर येथील रुस्तमजी ट्रुपर्स या शाळेतील पालकांनी याविरोधात शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेत शाळेवर कारवाईची मागणी केली आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये फी वाढीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोमवारी दहिसर येथील रुस्तमजी ट्रुपर्स या शाळेतील पालकांनी याविरोधात शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेत शाळेवर कारवाईची मागणी केली आहे. पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये पालकांनी शाळेच्या प्रांगणातच मुंडन करीत नेमलेल्या पीटीएच्या विरोधात आंदोलन केले. यामुळे फी वाढीचा मुद्दा येत्या काळात पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

दहिसर येथील रुस्तमजी ट्रुपर्स ही शहरातील विनानुदानित शाळा आहे. शाळेच्या पहिली इयत्तेच्या तब्ब्ल २७० पालकांनी शाळेविरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शाळेच्या दैनंदिन कारभारात अनियमितता असल्याचे समोर आले आहे. शाळेकडून कॅपिटेशन फी आकारली जात असल्याचा आरोप करीत सोमवारी अनेक पालकांनी युवा सेनेचे सदस्य साईनाथ दुर्गे आणि पवन जाधव यांच्यासह पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडे धाव घेतली. शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली. या शाळेकडून शाळा शुल्कासाठी उशीर झाल्यानंतर दर दिवसाला १०० रुपये याप्रमाणे दंड वसुली केली जाते, अशी माहिती यावेळी पालकांनी दिली, असे युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांनी सांगितले. एकीकडे पालकांची आर्थिक लूट होत आहे आणि दुसरीकडे यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करण्यात कुचकामी ठरत आहेत. मात्र आम्ही याचा पाठपुरावा करून पालकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असेही दुर्गे यांनी सांगितले.

- Advertisement -

नवी मुंबईतही लूटदुसरीकडे नवी मुंबईतही फी वाढीचा मुद्दा सोमवारी चांगला गाजला. पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कूल शाळेच्या पालकांनी शाळेच्या आवारातच मुंडन करुन पीटीए निवडीला जोरदार विरोध दर्शविला. पनवेलच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी पीटीएची निवड स्थगित करण्याचे आदेश दिल्यानंतरही प्रशासनाने आपला हेका कायम ठेवला. शाळेच्या या हुकुमशाही कृतीला विरोध करत पालकांनी मोठ्या संख्येने जमून शाळेसमोर जोरदार घोषणा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -