घरमुंबईपालकांनो मुलांच्या दाताची काळजी घ्या

पालकांनो मुलांच्या दाताची काळजी घ्या

Subscribe

खेळता- खेळता मुलं पडून पुढचे दोन पक्के दात पडण्याचं प्रमाण मुलांमध्ये मुलींच्या तुलनेत जास्त आहे

मुलांना शाळेत घातल्यानंतर त्यांच्या वाढलेल्या खेळाच्या सवयींमुळे अनेकदा ते पडतात. त्यातून त्यांची दात पडण्याची दुर्घटना घडते. पण, याबाबत खेळाच्या शिक्षकांना आणि मुलांच्या पालकांना ज्ञान नसल्याकारणाने दातांची काळजी कशी घ्यावी? हे कळतं नाही. याचबाबत पालक आणि शाळेतील शिक्षकांमध्ये मुल खेळत असताना कशापद्धतीने काळजी घ्यावी याविषयीचा शासकीय दंत महाविद्यालयाकडून मुंबईतील पालिका शाळेतील मुलांचा सर्व्हे केला गेला. ज्यात मुलींपेक्षा मुलांचं खेळताना पडून दात पडण्याचं प्रमाण जास्त आहे.

खेळताना पडतात मुलांचे दात

मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालयाकडून केलेल्या सर्व्हेक्षणात डॉक्टरांनी मुंबई महापालिकेतील १० शाळांमध्ये जाऊन जवळपास २ हजारांहून अधिक मुलांच्या दातांची तपासणी केली. नऊ महिन्यांमध्ये केल्या गेलेल्या या सर्व्हेत १२.३७ टक्के मुलांचे पुढचे दोन दात पडणं हे सर्वसाधारणपणे आढळलं. म्हणजे खेळता- खेळता मुलं पडून पुढचे दोन पक्के दात पडण्याचं प्रमाण मुलांमध्ये मुलींच्या तुलनेत जास्त आहे. शिवाय, कोणत्याही दाताला झालेली इजा नेमकी कशामुळे झाली हे शोधण्याचा विशेष प्रयत्न या सर्व्हेदरम्यान करण्यात आला. खासगी शाळामध्ये मुलं खेळताना विशेष काळजी घेतली जाते. पण, तसं पालिकेच्या शाळेत होत नाही. त्यामुळे हा सर्व्हे विशेषत: पालिकेच्या शाळांमध्ये घेतला गेला. यात मुलांचं १८.१ टक्के आणि मुलींचं ९.६ टक्के प्रमाण आढळलं आहे.

याविषयी शासकीय दंत महाविद्यालयातील बाल दंतचिकित्सक तज्ज्ञ डॉ. डिंपल पाडावे यांनी सांगितलं की, ” शाळेत मुलं खेळताना कोणती विशेष काळजी घेतली जाते का? शिवाय, खेळता-खेळता किंवा धक्काधक्कीत ही मुलं पडतात. त्यातही मुलांचे दात पडण्याची घटना घडते. ७ ते १५ वयोगटातील २०१२ मुलांच्या दातांची तपासणी केली गेली. त्यात सर्वात जास्त मुलं खेळत असताना पडून पुढचे दात पडले आहेत. याचं प्रमाण १२.३७ टक्के एवढ्या मुलांमध्ये हे प्रमाण आहे. कुटुंबिय आणि शाळेतील शिक्षकांनी मुलं खेळत असताना त्यांना माऊथ गार्ड वापरणं गरजेचं आहे. “

- Advertisement -

खेळताना दातांना इजा होण्याचे प्रकार

अख्खा दात पडणं
फक्त दाताचा तुकडा पडणं
दाताला मुका मार लागून दात हलणे
दात काळा पडतो.
दात तुटत नाही फक्त हलतो.

मानसिक ताण ही वाढतो 

लहान मुलाचा समोरचा दात पडला तर अनेकदा त्यांच्या मानसिक स्वास्थावरही परिणाम होतो. ते हसणं, बोलणं, खाणं सोडू शकतात. त्यांच्याच वयातील मुलं त्यांना चिडवू लागतात. त्यामुळे, त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. त्यामुळे, पालकांनी आणि शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या इतर गोष्टींसह दातांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला सहाय्यक प्राध्यापक डॉ. विलास यांनी दिला आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -