घरमुंबईपिंटो पार्क हॉटेलची जागा शासनाची

पिंटो पार्क हॉटेलची जागा शासनाची

Subscribe

बठीजाच्या बार तोडण्याचा आदेश ओमी कलानीने केला व्हायरल.

कलानी आणि बठीजा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बठीजा परिवाराची मालमत्ता असलेल्या पिंटो पार्क हॉटेल आणि बार असलेला भूखंड हा शासकीय मालकीचा असून बारचे बांधकाम बेकायदेशीर असल्याने तात्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिले आहेत.

इंदर बठीजा हत्या प्रकरणात पप्पू कलानीला आजीवन कारावासाची शिक्षा झाली. ओमी कलानीने महापालिकेच्या निवडणुकीत भरलेला उमेदवारी अर्ज कमल बठीजा यांनी अपात्र ठरविला. आता कमल बठीजा यांनी महापौर पंचम कलानी यांना अपात्र ठरविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. तसेच बेकायदेशीर धंद्यांमध्ये लिप्त असलेल्या कलानी समर्थकांवर पोलीस कारवाईचा बडगा उगारण्यासाठी बठीजा हे प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. यामुळे बठीजा यांना रोखण्यासाठी कलानी परिवाराकडून व्यूहरचना आखली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पावसाचा फटका प्राणी-पक्ष्यानांही बसला

नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार ज्योती कलानी यांनी पिंटो पार्कचा विषय उचलला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने पिंटो पार्कच्या भूखंडाला टाकलेले कम्पाऊंड तोडण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी ओमी कलानी यांनी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांचा एक आदेश सोशल मिडीयावर टाकला आहे. या आदेशात पिंटो पार्क हॉटेलचा भूखंड हा शासकीय मालकीचा असल्याने ती जागा तात्काळ खाली करण्याचे तसेच बांधकाम हटविण्यास सांगितले आहे.

सदरचा भूखंड हा १९६५च्या पूर्वीपासून आमच्या ताब्यात आहे. तसेच उल्हासनगर नगरपरिषदचे पिंटो पार्क ही मालमत्ता अधिकृत असल्याचे आमच्याकडे पत्र आहे, हे पुरावे शासनाला सादर करणार.
कमल बठीजा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -