घरमुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार 'वृक्ष लागवड' !

मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार ‘वृक्ष लागवड’ !

Subscribe

मेट्रो कारशेड आणि मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत छाटणी होणाऱ्या झाडांच्या तुलनेत मुंबईत ३० हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ठेवले आहे. मुंबई महापालिकेच्या वृक्ष लागवडीच्या निकषाच्या तुलनेत हे लक्ष्य तिप्पट असणार आहे. महत्वाचे म्हणजे या वृक्ष लागवडी अंतर्गत नष्ट झालेले वनक्षेत्र पुनर्जिवीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या ग्रीन इनिशिएटीव्ह अंतर्गत भारतीय प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

भारतीय प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य

- Advertisement -

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन पर्यावरण रक्षा (एमएमआरसी) यांच्यात वृक्षलागवडीसाठी करार झाला आहे. या करारान्वये २० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. एकूण १९ हेक्टर जमिनीवर ही वृक्ष लागवड होईल. नष्ट झालेल्या वनक्षेत्रात वृक्ष लागवड करण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे. या वृक्ष लागवडीअंतर्गत भारतीय प्रजातीच्या वृक्षांमध्ये जवळपास दहा प्रकारचे वृक्ष लावण्यात येतील. त्यामध्ये बेल, बहावा, अकेशानिम, उंडी, ताम्हण अशा झाडांची लागवड होईल. भारतीय वृक्षांच्या माध्यमातून कीटक, पक्षी, प्राणी यासारखी जैवविविधता कायम ठेवण्यासाठीचा हेतू आहे.

वनविभागाकडे झाडांच्या देखभालीची जबाबदारी 

- Advertisement -

पर्यावरण साखळी पूर्ण होण्यासाठी याची मदत होईल, असे एमएमआरसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन टप्प्यांमध्ये या वृक्षाची लागवड करण्यात येईल. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात वृक्ष लागवड होईल. तर दुसऱ्या टप्प्याअंतर्गत झाडांची देखभाल करण्यात येईल. झाडांच्या देखभालीची जबाबदारी ही वनविभागाकडे असेल. सुरूवातीची तीन वर्षे वृक्ष लागवडीच्या हेतुने महत्वाची असतील, असेही अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकल्पासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मदत करणार असल्याचे समजते. एमएमआरसीच्या ग्रीन इनिशिएटीव्ह अंतर्गत ही वृक्ष लागवड होईल.

मेट्रो ३ प्रकल्प (प्रातिनिधीक चित्र)

आजवर २४१० वृक्षांची लागवड झाली 

मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत कुलाबा वांद्रे सीप्झ दरम्यान जवळपास १०७४ वृक्ष कापण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेने एमएमआरसीला तशी परवानगी दिली आहे. कापण्यात आलेल्या वृक्षाच्या तुलनेत आरे कॉलनी, नेव्ही परिसर, विद्यानगरी (सांताक्रुझ) यासारख्या परिसरात आतापर्यंत २४१० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती आहे. या झाडांच्या मोबदल्यात तिपटीने झाडे लावण्यात येणार आहेत. याठिकाणीही भारतीय वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या वृक्ष लागवडीमुळे कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन कमी होण्यासाठी मदत होईल.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -