घरमुंबईमहापालिकेकडून दोन लाख वृक्षांची लागवड

महापालिकेकडून दोन लाख वृक्षांची लागवड

Subscribe

येत्या पावसाळ्यात महापालिका प्रशासन दोन लाख वृक्षांची लागवड करणार असून यामध्ये खारफुटीहीचेही रोपटे लावण्यात येणार आहेत.

शहरातील काँक्रिटचे जंगल दिवसेंदिवस वाढत असून रस्ता रुंदीकरण आणि बांधकामांसाठी शेकडो वृक्ष हटविण्यात येत आहेत. त्याची भरपाई म्हणून महापालिका प्रशासन शहरात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करते. यंदाही शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत महापालिका प्रशासन दोन लाख वृक्षांची लागवड करणार आहेत. त्याचप्रमाणे खाडी किनारपट्टीचे संरक्षण व्हावे, तेथील पर्यावरण अबाधीत रहावे म्हणून एक लाख खारफुटी लावण्यात येणार आहेत.

सीड बॉलचे विनामूल्य वाटप

आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत वृक्ष लागवडीची सूचना देण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांची समतोल छाटणी करण्याचे आदेशही आयुक्तांनी उद्याान विभागाला दिले आहेत. ठाणे शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी वृक्षप्राधिकरणामार्फत शाळा, महाविद्याालयीन विद्यार्थी यांना बियांचा समावेश असणारे मातीचे चेंडू (सीड बॉल) विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच नवीन सी.आर.झेड. नियमानुसार नव्याने उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागेवर कांदळवन लागवड करण्याऐवजी वृक्षांची लागवड करण्यात यावी. जेणेकरुन त्याठिकाणी भेट देत असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांकरिता हरितक्षेत्र तयार होईल, असेही या बैठकीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टातंर्गत करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीसाठी वृक्षप्राधिकरण सदस्यांना प्रत्येकी एक ठिकाण देऊन प्रत्येकामार्फत वृक्षलागवडीचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकामार्फत वृक्षांचे पुनर्रोपण करणारे यंत्र नागरिक, विकासक इतर संस्था यांना भाड्याने देण्यात यावे जेणेकरुन शहरातील बाधित वृक्षांचे पुनर्रोपण तांत्रिकदृष्ट्या शक्य होईल, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

बाधित वृक्षांच्या बदल्यात १७ हजार ६३५ वृक्षांचे रोपण

ठाणे महापालिका क्षेत्रात नाल्यांच्या सफाईचे काम सुरू असून नाल्यांच्या भिंतीवर उगवलेली प्रामुख्याने पिंपळ आणि इतर प्रजातींची झाडे काढून टाकण्यात यावी, असे आदेश या बैठकीत देण्यात आले. तसेच ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित तसेच खाजगी अर्जदारांमार्फत विकासकामांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात आठ ते दहा फूट उंचीच्या १७ हजार ६३५ झाडांचे नव्याने रोपण करण्यात येईल, अशी माहिती बैठकी दरम्यान देण्यात आली आहे.


वाचा – पावसाळ्यासाठी ठाण्यातील महापालिका प्रशासन सज्ज

- Advertisement -

वाचा – महापालिका चौकीदारांना ‘अच्छे दिन’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -