घरताज्या घडामोडीमुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कलम १४४ लागू

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कलम १४४ लागू

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दहशतवादी हल्ला होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाचं पत्र मिळताच मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण शहरात ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबईवर दहशतवादी किंवा देशविरोधक ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, मिसाइल किंवा पॅराग्लायडरद्वारे हल्ला करु शकतात, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. अतिमहत्वाच्या व्यक्ती किंवा गर्दीची ठिकाणांवर दहशतवादी लक्ष्य करु शकतात, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. शिवाय, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केलं जाऊ शकतं, असंही मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हल्ल्याच्या शक्यतेनंतर मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आलं असून पुढील ३० दिवस हे आदेश लागू असणार आहेत, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. शिवाय, ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाइट एअरक्राफ्ट आदी उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सतर्क राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -