घरमुंबईप्रवीण दरेकरांना मुंबै बँक प्रकरण भोवणार, बँकचा ऑडिट होणार

प्रवीण दरेकरांना मुंबै बँक प्रकरण भोवणार, बँकचा ऑडिट होणार

Subscribe

बँकेच्या व्यवहारात तफावत झाल्याचे अहवालात उघड

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे राज्यातील सर्वच राजकीय प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतात. परंतु विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत भर पडली आहे. मुंबै बँक प्रकरणी प्रवीण दरेकर यांची अडचणीत भर पडणार आहे. कोरोना काळात राज्य सरकारने उभारलेल्या कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर काढला होता. तर कोरोना काळात सरकारने केलेली वीजबील दरवाढ, वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज खंडीत करण्यात आले यावरही विरोधी पक्षाकडून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच नुकतेच सुरु असलेले पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आणि कारावाईसाठीची मागणी केली होती. परंतु मुंबै बँक घोटाळाप्रकरण आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढवणार आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या अडचणी आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. कारण मुंबै बँकचा सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. नाबार्डच्या २०१८-१९च्या अहवालामध्ये बँकेच्या कामकाजावरती ताशेरे ओढण्यात आले आहेत. मुंबै बँकेच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु होती. या चौकशीमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीचा उलघडा झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी डोकेदुखी ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सरकारच्या मानसिकतेवरच हल्ला, इंधन दरवाढीवरून दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल


मुंबै बँक घोटाळ्या प्रकरणी सादर केलेल्या अहवालात बँकेच्य शाखांचे भाडे करार, आधुनिकीकरण,संगणकीकरण, आणि फर्निचर खरेदीतील व्यवहारांत मोठी तफावत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात बँकेचा सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय सहकार विभागाकडून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्य सरकारमध्येच गोंधळ

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. अव्वाच्या सव्वा बिले बनवण्यात आली असल्याचे पहिलेही जाहीर केले आहे. आरोग्य व्यवस्थेची विरोधी पक्षाने पुराव्यासह चिरफाड केली होती. आरोग्य सेवकांची भर्ती असताना पेपर फुटतात तर आरोग्य व्यवस्थेला काय निर्दोष देणार ती सदोष असणारच. कोविन अॅप त्रुटी आणि गोंधळावर बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारमध्ये गोंधळ आहे. सरकारमध्ये गोंधळ असल्याने प्रशासनातही गोंधळ उडणे स्वाभाविकच आहे. लसीकरणावेळी काही ठीकाणी सॉफ्टवेअरमध्ये अडचणी आल्या, भाषेच्या बाबतीत अडचणी आल्या तर पुरेसे कर्मचारीही उपस्थित नव्हते. या गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिक सकाळपासून दुपारपर्यंत उभे राहत असतील तर ते सरकारला शोभा देणारं नाही असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -