घरमुंबईरखडलेल्या रेल्वे प्रकल्पांना नवसंजीवनी

रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांना नवसंजीवनी

Subscribe

मुंबईसाठी 578 कोटींची तरतूद

मुंबईसह राज्यातील रखडेल्या रेल्वे प्रकल्पांना लवकरच नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्यातील तरतुदीनुसार यंदा मुंबईतील रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे ५७८ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सीएसटीएम रेल्वे स्थानकांच्या विस्ताराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मुबंई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) राबविण्यात येणार्‍या अनेक प्रकल्पांचाही मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारतर्फे अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींचा अहवाल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात वरील माहिती प्रसिद्ध झाली असून यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अहवालानुसार मागील कित्येक वर्षांपासून मुंबई आणि मुंबई उपनगरातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाला, यंदाच्या अर्थसंकल्पात संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या अहवालानुसार एमयुटीपी आणि इतर प्रकल्पांसाठी एकूण 743 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय मध्य रेल्वेला 7955 कोटी तर पश्चिम रेल्वेला 6346 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार अर्थसंकल्पात रेल्वेचे नविन कोणतेही प्रकल्प जाहीर न करता सुरु असलेल्या, रखडलेल्या किंवा याआधी परवानगी मिळालेल्या प्रकल्पांना निधी देण्यास प्राधान्य दिलेले गेले आहेत.

- Advertisement -

मुंबई आणि उपनगरातील अनेक रेल्वे प्रकल्पांचे काम निधी अभावी रखडले होते. या प्रकल्पांसाठी एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे एमयुटीपीच्या प्रकल्पांना अर्थसंकल्पात निधी द्यावा, अशी मागणीसुद्धा केली होती. त्यानुसार एमयुटीपीच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी 2 आणि एमयूटीपी 2 सी, एमयूटीपी 3 आणि एमयूटीपी 3-ए करिता निधी मंजूर करण्यात आला. तर एमयूटीपी 2 साठी 244 कोटी 92 लाख रुपये, एमयूटीपी 3 करता 283 कोटी 78 लाख तर एमयूटीपी 3 एमधील प्रकल्पांसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. एमयुटीपी 2 सी मधील हार्बर मार्गावरील कामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांचे काम सुरू करणे एमआरव्हीसीला शक्य होणार आहे.

मुंबई ते दिल्लीच्या वेग वाढविणासाठी 500 कोटींची तरतूद
मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली दरम्यान रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी 500 कोटीची तरतूद देखील केलेली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर दुसरे टर्मिनल, एटीव्हीएमची संख्या वाढविण्यावर भर, चर्चगेट-विरार ट्रॅक दुरुस्ती, लोअर परेल वर्कशॉपमध्ये एलएचबी कोचचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. नविन, दुरुस्ती अशी 42 पादचारी पुलांसाठी 100.87 कोटी रुपयांची, विरारमध्ये दुरुस्ती डेपोसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

एमयुटीपी 2- 244.92 कोटी रुपये
ठाणे ते दिवा 5-6 वा मार्ग,
मुंबई सेंट्रल ते बोरीवली 6 वा मार्ग,
सीएसएमटी-कुर्ला 5-6 वा मार्ग.

एमयुटीपी 3- 283 कोटी 78 लाख रुपये
– विरार ते डहाणू चौपदरीकरण
– पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग
– ऐरोली ते कळवा लिंक रोड
– 47 वातानुकूलित लोकल गाड्या
– रूळ ओलांडण्याचे प्रकार

एमयुटीपी 3 ए – 50 कोटी
सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग
210 वातानुकूलित लोकल गाड्या
पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग
सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा

वाहतूक सुविधा-500 कोटी
नवी दिल्ली-मुंबई वेग वाढविणे,
अंधेरी-विरार धीम्या मार्गावर 15 डब्बा लोकल,
जोगेश्वरीला नवीन टर्मिनल

रोड सुरक्षेसाठी 18 कोटी
चर्नी रोड-ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, दादर, लोअर
परेल-प्रभादेवी रोड ओव्हर पूल

सिग्नल -टेलिकम्युनिकेशन 6.10 कोटी
मुंबई सेंट्रल-विरार-वडोदरा-अहमदाबाद ट्रेन सुरक्षा
यंत्रणा,चर्चगेट-विरार एमटीआरएस यंत्रणा, चर्चगेट-विरार वॉर्निग यंत्रणा

इतर सुविधा-62.62 कोटी
32 स्थानकांवर एकात्मिक सुरक्षा यंत्रणा (20 कोटी), रेल्वे परिसरात
संरक्षत भिंत, 1318 स्थानकात व्हिडिओयंत्रणा, बांद्रा स्थानकाचे नूतनीकरण
(5.62 कोटी)

– बूलेट ट्रेन प्रकल्पासाठी १० हजार कोटी
– लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये क्षमता वाढवण्यासाठी ७ कोटी
– सीएसएमटी फलाट २४ डब्यांच्या ट्रेनसाठी वापरण्याजोगे करण्याकरीता ४ कोटी

प्रवासी सुविधा
एक्सलेटर( 55) = 5.30 कोटी
लिफ्ट(100) = 5.10 कोटी
तिकिट यंत्रणा = 4.15 कोटी
बेलापुर-सीवुड-उरण विद्युतीकरण = 154 कोटी
इतर प्रकल्प = 12 कोटी
कल्याण-कसारा 3 री लाईन = 10 कोटी
वसई-रोहा-दिवा-पनवेल आटोमॅटिक सिग्नल यंत्रणा = 1 कोटी
337 एटीव्हीएम बदलण्यासाठी = 4.14 कोटी
संरक्षक भिंत = 10 कोटी
पादचारी पुल पुनर्रचना = 6 कोटी
नवीन पादचारी पूल = 5 कोटी
पश्चिम रेल्वेवर संरक्षक भिंत= 26 कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -