घरताज्या घडामोडीबेस्ट उपक्रमाच्या वीज ग्राहकांसाठी विविध देयकांचे प्रदान

बेस्ट उपक्रमाच्या वीज ग्राहकांसाठी विविध देयकांचे प्रदान

Subscribe

बेस्ट उपक्रमाच्या वीज देयकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बेस्ट उपक्रमाने मुंबईतील २०१ ठिकाणी विविध बँकाच्या माध्यमातून अतिरिक्त वीजदेयक भरणा केंद्रे सुरु केली आहेत.

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या वीज देयकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बेस्ट उपक्रमाने मुंबईतील २०१ ठिकाणी विविध बँकाच्या माध्यमातून अतिरिक्त वीजदेयक भरणा केंद्रे सुरु केली आहेत. वीज ग्राहकांना वीजदेयकाचे प्रदान सोयीस्कर व्हावे यासाठी बेस्ट उपक्रमाने ही उपाययोजना सुरू केली आहे. (Provision of various payments to electricity consumers of BEST initiative)

ठाणे जनता सहकारी बँकेच्या ५५ शाखांमधून स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या ५२ शाखांमधून भारत देयक प्रदान प्रणालीच्या (BBPS) अंतर्गत असलेल्या बँकाच्या ४२ ठिकाणी तसेच कोटक महेंद्र शाखेच्या ३४ शाखांमधून, येस बँकेच्या १५ शाखांमधून आणि इंडस इंड बँकेच्या ०३ शाखांमधून वीजदेयकाचे प्रदान जमा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने त्यांच्या मुंबईतील सर्व शाखांना प्राधिकृत केले आहे.

- Advertisement -

वीजदेयक भरणा केंद्रांच्या ठिकांणांची यादी बेस्ट उपक्रमाच्या www.bestundertaking.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वीजग्राहक त्यांच्या घराजवळील किंवा कार्यालयानजिकच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सोयीने वीजदेयकाचे प्रदान करून वेळेची बचत करू शकतात. बेस्ट उपक्रमाद्वारे सर्व वीजग्राहकांना असे आवाहन करण्यात येते की, त्यांनी या नवीन सुविधेचा लाभ घेऊन सुलभरीतीने वीजदेयकाचे प्रदान करावे त्याचप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने देखील वीजदेयकांचे प्रदान करुन वीजग्राहक प्रोत्साहनपर रकमेचा लाभ घेऊ शकतात.

दरम्यान, वीजदेयक भरणा केंद्रांच्या ठिकाणी बेस्ट उपक्रमाच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव देखील भरता येणार आहे. त्यामुळे याची सर्व वीज ग्राहकांनी नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून बेस्ट प्रशासनाकडून मुंबईतील ग्राहकांना वीजबिल देण्यात येत असून, या बिलांसोबत जोडपत्रही देत आहे. या पत्रात बेस्टची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे दोन महिन्याच्या बिलांची रक्कम आगाऊ भरा असे लिहले असल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.


हेही वाचा – इमारतीच्या लिफ्टमध्ये महिला असुरक्षित; पनवेलच्या हायप्रोफाईस सोसायटीतून धक्कादायक प्रकार उघडकीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -