घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकला रेबिझ मुक्त करण्यासाठी लंडनहून आली ७ कोटींची ट्रक

नाशिकला रेबिझ मुक्त करण्यासाठी लंडनहून आली ७ कोटींची ट्रक

Subscribe

नाशिक : रेबिझ आजारचे प्रमाण आजही देशातील पाळीव तसेच भटक्या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. याच रेबिझचे समूळ उच्चाटन व्हावे या हेतूने वर्ल्ड वेटीनरी सर्विस, मिशन रेबिझ आणि अॅनिमल वेल्फेयर अँड अॅंटी हरासमेंट सोसायटी यांच्या सयुक्त विद्यमानाने नाशिक शहरात पुढील दीड महिना एक विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. ज्या माध्यमातून शहरातील कानाकोपर्‍यात पोहचून भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांना रेबिझ आजारावरील लस दिली जाणार आहे. सोमवारी (दी.९) माजी पालकमंत्री छगन भूजबळ यांच्या हस्ते या मोहिमेची सुरवात करण्यात आली.

संपूर्ण भारतात ह प्रकल्प राबवला जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही नाशिकलाही रेबिझमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. हे लसीकरण पूर्णतः मोफत असणार आहे. तसेच, याच मोहिमेच्या अंतर्गत कुत्र्यांना इतर काही दुखापत किंवा आजार झाला असेल तर त्यावर शस्त्रक्रिया आणि उपचारही केले जाणार आहेत : गौरव क्षत्रीय, आयोजक

लंडनहून आला विशेष मर्सिडिझच्या ट्रकवर सुसज्ज दवाखाना

नाशिक मध्ये ही मोहीम राबवण्यासाठी थेट लंडन येथून भल मोठ वाहन दाखल झालं आहे. मर्सिडिझ कंपनीची ही ट्रक आहे. या ट्रकला थेट एका चालत्याफिरत्या रुग्णालयात परावर्तीत करण्यात आल आहे. या भव्य ट्रकमध्ये अगदी तपासणी आणि प्रशिक्षण कक्ष ते ऑपरेशन थेटर आणि वायु भूलशस्त्र अशी विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्याचसोबत एक्सरे मशीन, लॅब, कोल्ड स्टोरेज, ऑक्सीजन मशीन अश्या अनेक अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -