घरCORONA UPDATEआर.आर रुग्णालयात असुविधा; कोरोना रुग्णांनी घेतला सोशल मीडियाचा आधार 

आर.आर रुग्णालयात असुविधा; कोरोना रुग्णांनी घेतला सोशल मीडियाचा आधार 

Subscribe

डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात संपूर्ण कुटुंबासोबत उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णाने रुग्णालयातील असुविधेबाबतची एक पोस्ट तयार करून छायाचित्रासह फेसबुकवर टाकून खळबळ उडवून दिली होती.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीसाठी रुग्णानी सोशल मीडियाचा प्लँटफार्म निवडला आहे. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात संपूर्ण कुटुंबासोबत उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णाने रुग्णालयातील असुविधेबाबतची एक पोस्ट तयार करून छायाचित्रासह फेसबुकवर टाकून खळबळ उडवून दिली होती. व्हायरल झालेल्या या पोस्ट नंतर या रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना तात्काळ दुसऱ्या रुग्णालय हलवण्यात आले आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली पूर्व येथे असणारे स्वतःचे आर.आर हे खासगी रुग्णालय नुकतेच कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ताब्यात दिले आहे. या रुग्णालयात मागील काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीतील सुमारे १५ ते १६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे. दोन दिवसापूर्वी डोंबिवलीतील निऑन या रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या ५५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला त्याच्या कुटुंबियांसह निऑन येथून आर. आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाने आर.आर रुग्णालयात कुठलीही सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली,  “मी व माझे कुटुंबीय डोंबिवली येथील एमआयडीसीमधील आर. आर रुग्णालयामध्ये कोरोना संसर्ग झाल्यामुळे ऍडमिट आहोत. आम्ही इथून जिवंत बाहेर निघू की आमच्या सर्वांच्या डेड बॉडीज इथून जातील? ही चिंता आत्ता आम्हाला सतावू लागली आहे. आपण या जिवघेण्या प्रसंगातून आम्हाला इथून जिवंत व सुखरूप बाहेर काढा अशी पोस्ट रुग्णालयातील छायचित्रासह फेसबुकवर टाकली.

- Advertisement -

आम्ही पूर्वी बघितलेले सोयी सुविधांनी स्वयंपूर्ण असलेले आर. आर रुग्णालय हे महापालिका प्रशासनाच्या ताब्यात गेल्यामुळे या रुग्णालयाची अवस्था बकाल झाली असून हे रुग्णालयातून कोरोनाचा रुग्ण बरा होऊन नाहीतर त्याचा मृतदेहाचं बाहेर पडेल असे या रुग्णाने आपलं महानगरशी बोलताना सांगितले. तसेच मी टाकलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच मला आणि माझ्या कुटुंबियांना तातडीने या रुग्णालयातून निऑन रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे या रुग्णाने सांगितले.

समाजात माझे होणारे कौतुक पाहून माझ्या काही अहितचिंतकानी मला आणि रुग्णालयाला बदनाम करण्याचे षढयंत्र रचले आहे, निऑन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला रात्रीच्या वेळी आर आर रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्या माध्यमातून या रुग्णालयात कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून माझी आणि रुग्णालयाची बदनामी करण्याचा विरोधकाचा डाव असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील केला आहे. याबाबत केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -