घरमुंबईमुंबईसह उपनगरात पावसाचा जोर

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर

Subscribe

गेल्या आठवडाभर बरसणाऱ्या पावसाने एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. आज सकाळपासूनच मुंबई शहरासह दोन्ही उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

गेल्या आठवडाभर बरसणाऱ्या पावसाने एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. आज सकाळपासूनच मुंबई शहरासह दोन्ही उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर बुधवारी शहरात ४६ मिमी, पश्चिम उपनगरात – ३३ मिमी तर पूर्व उपनगरात २७ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज देखील मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी पडत असून अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे येत्या काही तासात पाऊस पडल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याचे अंदाज चुकले

सलग तिसऱ्या दिवशी हवामान विभागाचे अंदाज चुकले आहेत. येत्या २४ तासाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र, हवामान खात्याचा अंदाज सलग तिसऱ्या दिवशी देखील चुकवत आज पावसाने हजेरी लावली आहे. उपग्रहाच्या प्रतिमामध्ये बुधवारी सकाळी किनारपट्टीजवळ ढगांचा पुंजका दिसत होता. त्यामुळे मुंबईत दिवसभर पाऊस पडेल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत उपनगरांमध्ये संततधार कायम होती. तर मुंबई शहरामध्ये आज देखील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे.

- Advertisement -

आठवड्याभरात विक्रमी नोंद

मुंबईमध्ये २६ जून ते ३ जुलैपर्यंतच्या आठवड्यामध्ये साप्ताहिक सरासरीच्या ३२३ टक्के पाऊस पडला. तर, ३ जुलै ते १० जुलै या कालावधीमध्ये साप्ताहिक सरासरीच्या ५५ टक्के पाऊस होता. २६ जून ते ३ जुलै या काळातील विक्रमी पावसाने महिन्याची सरासरी भरुन काढली आहे. या तुलनेत शहरामध्ये २६ जून ते ३ जुलै या आठवड्यात साप्ताहिक सरासरीच्या १६८ टक्के पाऊस पडला. ३ ते १० जुलै या आठवड्यात साप्ताहिक सरासरीच्या अवघा सहा टक्के पाऊस पडला आहे.


हेही वाचा – पाऊस होऊनही मराठवाड्याला चिंता नाशिकची

- Advertisement -

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 667 मिमी पाऊस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -