घरमुंबईमहाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या टीजर रीलीज प्रसंगी राज ठाकरेंची राजकीय फटकेबाजी

महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या टीजर रीलीज प्रसंगी राज ठाकरेंची राजकीय फटकेबाजी

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या टीजर प्रदर्शनाला हजेरी लावली होती. राज ठाकरे यांच्याच हस्ते या चित्रपटाचा टीजर प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज यांनी राजकीय फटकेबाजी सुद्धा केली.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित असा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज (ता. २० मार्च) या चित्रपटाचा टीजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रीलीज करण्यात आला. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लोकनाट्यकार आणि लोकशाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरी याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. अंकुश चौधरी यांनी साकारलेल्या भूमिकेचे राज ठाकरे यांच्याकडून यावेळी कौतुक करण्यात आले. तर आमची अवस्था सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखी झाली असल्याचे सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी म्हंटले आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांना ‘बाळ’ अशी हाक मारणारे शरीर एक होते. शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरांत पोहोचवली. तर शाहिरांचा प्रवास हा स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंतचा आहे. तर जेव्हा मला केदारने चित्रपटाबद्दल सांगितले, तेव्हा मला धाकधूक होती. मी त्याला प्रश्न विचारला की, शाहीरांचे काम कोण करणार? तर त्याने अंकुश चौधरी उत्तर दिलं. तो शाहीरांसारखा दिसेल का? असा प्रश्न मी त्याला विचारला. तर त्याने मला सांगितलं, तो त्यांच्या भूमिकेत शिरेल. मी आज चित्रपटाचा टीझर पाहिला. मला दिसलं की, अंकुश हा खरंच भूमिकेत शिरला आहे, असे बोलत त्यांनी अंकुश चौधरींच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे.

- Advertisement -

यावेळी राज ठाकरे यांनी राजकीय फटकेबाजी देखील केली. २८ एप्रिल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण राज ठाकरे हे त्यावेळी बाहेरगावी असणार आहेत. त्यामुळे याला उद्देशून बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही सध्या १०वी नापास विद्यार्थ्यांसारखे आहोत. निवडणुका या मार्च किंवा ऑक्टोबरमध्ये लागणार अशी चर्चा कायम होत असल्याने दहावी नापास असल्यासारखे वाटत आहे. निवडणूक येत नसते तर वातावरणात असते, सध्या तसे वातावरण नाही, त्यामुळे बाहेरगावी जबर असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

दरम्यान, २८ एप्रिल या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केलेले आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी याच्यासह अमित डोलावत, अतुल काळे, सना केदार शिंदे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिलेले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा तिसरा टीझर लॉन्च, बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ क्लिप पाहून लोक भावूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -