Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुली उचलून आणण्याची भाषा करणारे साधूंसाठी आंदोलन करतायत; जनाची नाही तर मनाची...

मुली उचलून आणण्याची भाषा करणारे साधूंसाठी आंदोलन करतायत; जनाची नाही तर मनाची तरी बाळगा

'मुली उचलून आणण्याची भाषा करणारे साधूंसाठी आंदोलन करतायत. जनाची नाही तर मनाची तरी बाळगा', असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत राम कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Related Story

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे या घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. मात्र, एक वर्ष पूर्ण होऊन देखील शासनाचा तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या निषेधार्थ खार पोलीस ठाणे हद्दीतून कार्यकर्त्यांसह सांधूना न्याय मिळावा याकरता भाजप आमदार राम कदम आज आंदोलन करणाार आहेत. यावरुन राष्ट्रवादी आक्रमक झाले असून त्यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मुली उचलून आणण्याची भाषा करणारे साधूंसाठी आंदोलन करतायत. जनाची नाही तर मनाची तरी बाळगा’, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत राम कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीचा राम कदमांवर आरोप

- Advertisement -

‘करून करून भागले आणि देवधर्माला लागले मराठीतली ही म्हण भाजपच्या ‘चमको’ नेत्यांना तंतोतंत लागू पडते. कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत. जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी’, असे म्हणत राम कदम यांच्यावर राष्ट्रवादीने निशाणा साधला आहे.

पालघर जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांडात मुळ पळवणारी टोळी गावात दाखल झाल्याच्या संशयावरुन प्रक्षुब्ध जमावाने साधूंची अमानुष मारहाण करत हत्या केली. दरम्यान, राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतत या घटनेनंतर १६५ संशयिंताना अटक करण्यात आली. तर कासा पोलीस स्थानकांतील दोन पोलिसांना निलंबितही करण्यात आले. त्याचप्रमाणे या घटनेची शिक्षा म्हणून पालघरचे एसपी गौरव सिंह यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.

- Advertisement -

परंतु, शासनाचा तपास पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ खार पोलीस ठाणे हद्दीतून कार्यकर्त्यांसह सिद्धिविनायकचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यापर्यंत शासनाच्या निषेधार्थ फलक घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राम कदम यांनी दिला आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले आहेत.

 


हेही वाचा – पडलेल्या सरकारला कसा टेकू लावायचा हे दादांना माहित आहे


 

- Advertisement -