घरमुंबईपालिकेच्या सुरक्षा रक्षकांची 550 पदांची भरती

पालिकेच्या सुरक्षा रक्षकांची 550 पदांची भरती

Subscribe

खासगी संस्थेकडून राबवली जाणार भरती प्रक्रिया

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांची पदे रिक्तआहेत. ही पदे रिक्त असल्याने उर्वरित सुरक्षा रक्षकांना सुरक्षेचा ताण सहन करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाने सुरक्षा रक्षकांची 550 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रकिया सरकारी मान्यताप्राप्त खासगी संस्थेकडून केली जाणार आहे. सल्याची माहिती महापालिकेच्या एका अधिकार्‍याने दिली. पालिकेचे सुरक्षा रक्षक नसल्याने नगरसेवकांकडून पदे भरण्यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे.

26/11 ला पाकिस्तानी आतंकवादी कसाबने मुंबईवर हल्ला केला. त्यावेळी महापालिकेच्या मुख्यालयामागील रस्त्याचा वापर केला होता. महापालिका मुख्यालयावर दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची नेहमीच भीती असते. पालिकेच्या सायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण झाल्याचे प्रकरण घडले होते. त्यानंतर रुग्णालयात खासगी सुरक्षा रक्षक वाढवण्यात आले. मात्र पालिकेच्या इतर कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षकांची पदे आजही रिक्त आहेत.

- Advertisement -

भरतीसाठी इयत्ता बारावी पास अशी अट असणार असून उमेदवारांची मैदानी परिक्षाही घेतली जाणार आहे. रिक्त असलेल्या 1050 पैकी 550 सुरक्षा रक्षकांची पदे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भरती प्रकिया राबवण्यासाठी पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. भरती प्रकिया सरकारी मान्यताप्राप्त खासगी संस्थेकडून केली जाणार आहे. या भरतीसाठी लवकरच वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून नंतर ऑनलाईन अर्ज मागवले जातील, अशी माहिती या अधिकार्‍याने दिली.

१०५० सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त

मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता,धरणे,जलवाहिन्या, जलाशय, भांडुप संकुल इतर महत्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा दल कार्यरत असते. महापालिकेच्या सुरक्षादलात एकूण 3 हजार 814 सुरक्षा रक्षक आहेत. त्यापैकी 500 ते 600 महिला सुरक्षा रक्षक आहेत. तसेच महापालिकेच्या सेवेत 70 ते 80 सशस्त्र सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सुरक्षा रक्षकांची एकूण 1050 पदे रिक्तआहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -