घरमुंबईअंतर्गत वादामुळेच दिला राजीनामा

अंतर्गत वादामुळेच दिला राजीनामा

Subscribe

पक्षांतराप्रसंगी चित्रा वाघ भावूक

राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्र वाघ यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. अखेर या टीकेला उत्तर देत चित्रा वाघ यांनी मौन सोडले. पतीवरील कारवाईमुळे नव्हे तर पक्षांतर्गत अंतर्गत वादामुळे आपण राजीनामा दिला असल्याचे त्यांनी बुधवारी जाहीर केले. त्यांच्यावर होत असलेल्या आरोप फेटाळून लावताना त्या भावूक झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील बाजू मांडली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या पतीविरोधात चौकशी सुरु असल्याने आपण बॅकफूटवर आल्याचे वृत्त त्यांनी यावेळी फेटाळून लावले. मी माझी कोणतीही भूमिका बदललेली नाही. माझ्या नवर्‍यावर केस सुरु आहे त्याचा कोणताही परिणाम मी कामावर होऊ दिला नाही. आंदोलने, मोर्चे बंद केले नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये माझ्यावर आंदोलन आणि मोर्च्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मी बॅकफूटवर आले असे म्हणणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तर यावेळी मधुकर पिचड म्हणाले की, आम्हाला वाट दाखवणार्‍या सगळ्यांचे मी आभार मानतो. यापुढे आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण करायचे आहे आणि त्याचमुळे माझ्यासहीत या सगळ्यांनीच भाजपात प्रवेश केला आहे. आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चांगले काम करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढील वाटचाल करायची आहे असेही पिचड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. शरद पवार असे म्हणत आहेत की ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्षांतर केले जाते आहे. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्ही जेव्हा शिवसेनेतून गणेश नाईक, छगन भुजबळ यांना फोडले त्यांना अशीच धमकी दिली होती का? ,असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, भाजप महायुती सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत झालेले महत्त्वाचे निर्णय आणि विकासकामे पाहून विविध पक्षांच्या नेत्यांची खात्री पटली आहे की, भाजपच्या माध्यमातूनच आपल्या भागाचे विकासाचे प्रश्न सुटतील. आज भाजपामध्ये प्रवेश करणार्‍या नेत्यांप्रमाणेच आणखी अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -