घरमुंबईरेल्वेच्या यु.टी.एस.अ‍ॅपला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

रेल्वेच्या यु.टी.एस.अ‍ॅपला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

Subscribe

एका वर्षात ११,६८९१३ युजर्सची वाढ

मुंबईतील तिकीट खिडक्यांवर वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने दोन वर्षांपूर्वी पेपर लेस तिकीट काढण्यासाठी यु.टी.एस. मोबाईल अ‍ॅप सुरू केले होते. या अ‍ॅपला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मार्च २०१७ ला युटीएसचे युजर्स ३ लाख ७४ हजार इतके होते. आज हा आकडा १५ लाख ४३ हजार ६०४ वर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे एका वर्षात यु.टी.एस. मोबाईल अ‍ॅपचे युजर्स ११,६८९१३ इतके वाढले आहेत. त्यामुळे रेल्वेची यु.टी.एस. मोबाईल अ‍ॅप प्रबोधनात्मक मोहीम फायदेशीर ठरली आहे.

रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी २०१५ मध्ये युटीएस नावाचे मोबाईल अ‍ॅप तयार केले होते. हे अ‍ॅप सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टमकडून (सीआरआइएस) तयार करण्यात आले होते. रेल्वेने हे यु.टी.एस.अ‍ॅप मोबाईलवर उपलब्ध करून दिले आहे. हे अ‍ॅप अनारक्षित (अनरजिस्टर्ड) तिकिटासाठी आहे. मागील दोन वर्षात या यु.टी.एस. मोबाईल अ‍ॅपकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यांनतर रेल्वे बोर्डाने मिशन मोडवर यु.टी.एस.अ‍ॅपविषयी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. त्याचा उपयोग झाला.

- Advertisement -

एप्रिल २०१७ ला या यु.टी.एस. मोबाईल अ‍ॅपचे युजर एकूण ३ लाख ७४ हजार ६१९ इतके होते. आजही १५ लाख ४३ हजार ६०४ इतकी वर जाऊन पोहचली आहे. म्हणजे मागील एका वर्षात ११ लाख ६८ हजार ९१३ इतकी यु.टी.एस.अ‍ॅप वापरणार्‍यांची संख्या झाली आहे. यामागचे कारण म्हणजे पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने यु.टी.एस. मोबाईल अ‍ॅपची माहिती प्रवाशांपर्यंत पोहचवली. यासाठी प्रबोधनात्मक मोहीम हाती घेतली होती. त्या माध्यमातून रेल्वेने मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर विशेष टेबल लावून प्रवाशांना या यु.टी.एस.अ‍ॅपची माहिती देणे सुरू केले होते. त्यामुळे मागील काही महिन्यात या अ‍ॅॅपच्या वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहिती नुसार यु.टी.एस. मोबाईल अ‍ॅप वापरकर्त्यांची विक्रमी नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१८ ला यु.टी.एस. मोबाईल अ‍ॅपचे युजर ७ लाख ९६ हजार ४०१ इतके होते. मात्र मागील ८ महिन्यात ७ लाख ४७ हजार २०३ इतकी अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या रेल्वे तिकीट खिडक्यांवरील गर्दी नक्कीच कमी होईल, अशी अशा रेल्वे अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. सोबतच भविष्यात रेल्वेच्या तिकीट यंत्रणेत यु.टी.एस. अ‍ॅप एक मोलाची भूमिका बजावणार आहे.

- Advertisement -

———————–
यु.टी.एस.अ‍ॅप युजर्स
मार्च २०१७ = ३७४६११
मार्च २०१८ = 7,96401
ऑक्टोबर २०१८ =१५४३६०४
———————————
पश्चिम रेल्वे
————————–
कोटीव्हीएम मशीन = ३२
एटीव्हीएम मशीन =३७०
जेटीबीएस सेवक = ३८
युटीएस अ‍ॅप युजर्स = १५४३६०४
—————————————–

रेल्वेने मागील ३ वर्षांपासून यु.टी.एस. अ‍ॅप सुरू केले आहे. आता आम्ही या अ‍ॅपविषयी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे यु.टी.एस.अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. यु.टी.एस. अ‍ॅपमुळे रेल्वे तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी नक्कीच कमी होणार आहे. सोबत वाढत्या मोबाइलचा वापर लक्षात घेता यु.टी.एस. मोबाईल अ‍ॅप अधिकाअधिक प्रवाशांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– आरती सिंह परिहार, सिनियर डिव्हिजल कमर्शियल मॅनेजर,पश्चिम रेल्वे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -