घरताज्या घडामोडीट्रान्सहार्बर आणि  बेलापूर-नेरुळ -खारकोपर लाईनसाठी १ डिसेंबरपासून सुधारित वेळापत्रक लागू

ट्रान्सहार्बर आणि  बेलापूर-नेरुळ -खारकोपर लाईनसाठी १ डिसेंबरपासून सुधारित वेळापत्रक लागू

Subscribe

मध्य रेल्वे १ डिसेंबर २०२१ पासून हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन आणि चौथ्या कॉरिडॉर म्हणजेच बेलापूर-नेरुळ -खारकोपर लाईनसाठी सुधारित उपनगरीय वेळापत्रक लागू करणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

- Advertisement -

ट्रान्सहार्बर लाईन आणि  बेलापूर-नेरुळ -खारकोपर लाईनसाठी १ डिसेंबरपासून सुधारित वेळापत्रक लागू

• हार्बर मार्गावर १२ वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा १ डिसेंबर २०२१ पासून सुरू. सध्याच्या १२ सेवा वातानुकूलित सेवांनी बदलल्या जातील.

- Advertisement -

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अंधेरी सेवा आणि पनवेल -अंधेरी सर्व सेवांचा गोरेगाव स्थानकापर्यंत विस्तार.

• सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंधेरी दरम्यान चालणाऱ्या ४४ सेवा गोरेगावपर्यंत वाढवल्या जातील (सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोरेगाव दरम्यान ४२ सेवा सुरू आहेत).

• सध्या पनवेल आणि अंधेरी दरम्यान चालणाऱ्या १८ सेवा गोरेगावपर्यंत विस्तारीत केल्या जातील.

• सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान चालणाऱ्या २ सेवा गोरेगावपर्यंत वाढवल्या जातील.

• गोरेगाव ते/पर्यंत एकूण सेवांची संख्या ४२ वरून १०६ पर्यंत वाढेल.

• वांद्रे ते/पर्यंत एकूण सेवांची संख्या ८६ असेल.

• हार्बर मार्गावरील एकूण सेवांची संख्या सध्याप्रमाणे ६१४ आणि ट्रान्सहार्बर लाईनवर सध्याप्रमाणे २६२ राहतील आणि मुंबई विभागातील उपनगरीय सेवांची संख्या सध्याप्रमाणे १७७४ राहील.

• चौथ्या कॉरिडॉरवरील सकाळच्या पीक अवर्सच्या वेळेत सेवा वाढतील, तथापि एकूण सेवांची संख्या ४० इतकीच राहील.

• मानखुर्द पासून सुरू होणारी मूळ सेवा आता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून सुटेल.

• ठाणे येथून १०.४० वाजता सुटणारी TBR-1 बेलापूर लोकल आणि ठाणे येथून २३.१४ वाजता सुटणारी TBR-3 बेलापूर लोकल आता पनवेलपर्यंत चालविण्यात येईल.

हार्बर मार्गावर  १ डिसेंबर २०२१ पासून १२ वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा (रीपलेस्मेंट आधारावर) सुरू करण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.

हार्बर मार्गावरील खालील सेवा सोमवार ते शनिवार  १ डिसेंबर २०२१ पासून वातानुकूलित रेकसह चालतील आणि रविवारी/नामांकित सुट्टीच्या दिवशी सामान्य सेवेसह चालतील.

V-४ वाशी येथून ०४.२५ वाजता सुटणारी लोकल.

PL-१३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०५.१८ वाजता सुटणारी लोकल.

PL-२४ पनवेल येथून ०६.४५ वाजता सुटणारी लोकल.

PL-४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०८.०८ वाजता सुटणारी लोकल.

PL-५२ पनवेल येथून ०९.४० वाजता सुटणारी लोकल.

PL-७९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०४ वाजता सुटणारी लोकल.

PL-७८ पनवेल येथून १२.४१ वाजता सुटणारी लोकल.

PL-१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १४.१२ वाजता सुटणारी लोकल.

PL-११६ पनवेल येथून १५.४५ वाजता सुटणारी लोकल.

PL-१४५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १७.०८ वाजता सुटणारी लोकल.

PL-१४४ पनवेल येथून १८.३७ वाजता सुटणारी लोकल.

PL-१७५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.०० वाजता सुटणारी लोकल.

सुधारित वेळापत्रक दि. ३० नोव्हेंबर २०२१ पासून https://www.cr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. मेन लाइन वेळा पत्रकामध्ये कोणताही बदल नाही.


हे ही वाचा – Mann Ki Baat : स्वातंत्र्याच्या लढ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि बुंदेलखंड यांचं मोठं योगदान – पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -