घरक्रीडाIND vs NZ 1stTest: श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास; असे करणारा...

IND vs NZ 1stTest: श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास; असे करणारा पहिला भारतीय खेळाडू

Subscribe

न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपला पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने इतिहास रचला आहे

न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपला पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने इतिहास रचला आहे. मधल्या फळीतील फलंदाजाने त्याच्या करियरच्या पहिल्या कसोटी सामन्यात जी खेळी केली आहे, ती खेळी आतापर्यंत कोणताच भारतीय खेळाडू करू शकला नाही. कानपूरच्या कसोटी सामन्यात पदार्पण करून अय्यरने पहिल्या डावात शतक झळकावले होते. या सोबतच पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा तो १६ वा भारतीय खेळाडू बनला आहे. यानंतर त्याने दुसऱ्या डावात देखील शानदार फलंदाजी करून अर्धशतक केले. यासोबतच तो २ डावात शतक आणि अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.

न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्या डावात त्याने १७१ चेंडूत १०५ धावांची शतकीय खेळी केली होती. त्या खेळीत २ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. तर दुसऱ्या डावात देखील चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या अय्यरला कर्णधार रहाणेने पाचव्याच क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. अय्यर जेव्हा फलंदाजीसाठी आला होता तेव्हा संघाने ४१ धावांवर ३ बळी गमावले होते. अशातच अय्यरने १२५ चेंडूत ६५ धावांची महत्त्वाची खेळी केली.

- Advertisement -

कसोटीतील पदार्पणाच्या सामन्यातील भारतीय खेळांडूचे प्रदर्शन

शिखर धवन
धावा – १८७
पहिला डाव – १८७
दुसरा डाव – फलंदाजी आली नाही

रोहित शर्मा
धावा – १७७
पहिला डाव – १७७
दुसरा डाव – फलंदाजी आली नाही

- Advertisement -

श्रेयस अय्यर
धावा -१७०
पहिला डाव – १०५
दुसरा डाव – ६५

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक आणि एक अर्धशतक करण्याच्या बाबतीत श्रेयस अय्यर जगातील १३ वा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत वेस्ट इंडिजचा लॉरेन्स रोवे अव्वल स्थानावर आहे. त्याने फेब्रुवारी १९७२ मध्ये पदार्पण करताना पहिल्या डावात दुहेरी शतक केले होते. तर दुसऱ्या डावात नाबाद १०० धावांची शतकीय खेळी केली होती.


हे ही वाचा: http://IND vs NZ 2nd Test: मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -