घरमुंबईमालवणी भागात रोहिंग्या- पाकिस्तानी मुस्लिमांना आश्रय; मंगलप्रभात लोढा यांचा आरोप

मालवणी भागात रोहिंग्या- पाकिस्तानी मुस्लिमांना आश्रय; मंगलप्रभात लोढा यांचा आरोप

Subscribe

भाजपचाच पदाधिकारी बांगलादेशी नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर

मालाड-मालवणी भागात रोहिंग्या मुसलमान, बांगलादेश व पाकिस्तानातून आलेल्या मुस्लीम नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जात असल्याचा आरोप भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केला. त्यांच्या या वक्तव्यावर कौशल्य विकास मंत्री नबाव मलिक व मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी जोरदार आक्षेप घेतला.

मागील दहा वर्षांपासून मालाडच्या मालवणी भागात हिंदू धर्मियांवर इतर धर्मियांच्या दबावामुळे हिंदूंचे सातत्याने पलायन होत आहे. गेल्या पाच वर्षात पंधरा हजार हिंदू मतदार कमी झाले तर बारा हजार मुस्लिम मतदार वाढले. मालवणी भागात रोहिंग्या मुसलमान, बांगलादेशी व पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांमार्फत ड्रग्जचा बेकायदा व्यवसाय सुरु असल्याचा आरोप मंगलप्रभात लोढा यांनी केला. मालवणीच्या छेडानगरमध्ये १०८ हिंदू कुटुंब वास्तव्यास होते. मात्र आता ६० हिंदू कुटुंबे शिल्लक राहिली आहेत असा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

त्यावर मंत्री नवाब मलिक व अस्लम शेख यांनी जोरदार आक्षेप घेतला. नवाब मलिक म्हणाले की, उत्तर मुंबईतील भाजपच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी बांगलादेशी होता. पोलिसांनी त्याला अटक केल्याचे नवाब मलिक यांनी निदर्शनास आणले. मुंबईत बेकायदा वास्तव्य करणा-या बांगलादेशी नागरिकांना भाजपच आश्रय देत आहे आणि आमच्यावर आरोप करीत असल्याचे अस्लम शेख म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -