घरमुंबईकोरोना योद्ध्यांचा रोटरी क्लबकडून गौरव

कोरोना योद्ध्यांचा रोटरी क्लबकडून गौरव

Subscribe

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना सर्व प्रकारच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत आपले कर्तव्य निष्काम भावनेने बजावणाऱ्या कोरोना योद्धयांचा ‘रोटरी क्लब ऑफ मुंबई’ कडून ऑनलाईन गौरव करण्यात आला आहे. यामध्ये, महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या उपप्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे, पालिका कार्यकारीआरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, प्रमुख अग्निशमन अधिकारी कैलाश हिवराळे उपमुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, ‘ए’ विभागाच्या साहाय्यक आयुक्त चंदा जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता आंबेरकर, कस्तुरबा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार आदी मान्यवरांचा समावेश आहे.

मुंबई महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण शहरात सरकारी, पालिका, खासगी रुग्णालयात, मैदानावरील जंबो कोविड सेंटर आदी ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची विशेष काळजी घेत त्यांना कोरोना मुक्त करण्यासाठी दिवसरात्र अथक परिश्रम घेतले. त्यासाठी रुग्णालयीन डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, आया,सफाई कर्मचारी आदींनी जास्त मेहनत घेतली.
त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अगदी आपल्या कुटुंबाला कमी वेळ दिला तर रुग्णालयात जास्तीत जास्त वेळ रुग्ण सेवेला दिला. त्यामुळेच अनेकांचे प्राण वाचवले. हे कर्तव्य पार पाडत असताना मुंबई महापालिकेचे २७२ कर्मचारी शहीद झाले.

- Advertisement -

मात्र पालिका अधिकार व कर्मचारी आजही अखंडपणे कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देत आहेत. याबाबतची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ मुंबईतर्फे पालिकेच्या विविध अधिकारी, डॉक्टर आदींचा कोरोना योद्धा पूरस्कार देऊन त्यांचा ऑनलाईन कार्यक्रमात गौरव केला. त्यामुळे या सत्कारमूर्तींच्या वैद्यकीय सेवेला एकप्रकारे ‘रोटरी क्लब’ तर्फे सलामी देण्यात आली आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रप्रभा खोना आणि व्यावसायिक संचालक सुगरा बगसरावाला यांच्या हस्ते पालिका अधिकारी, डॉक्टर आदींचा गौरव करण्यात आला. रोटरी क्लबचे सुनील मेहरा यांनी पालिका कर्मचा-यांप्रती आदर व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -