घरमुंबईसामोसा, चायनीज खात असाल तर जरा सांभाळून...

सामोसा, चायनीज खात असाल तर जरा सांभाळून…

Subscribe

 

सामोसा आणि चायनीज असे पदार्थ खात असाल तर जरा सांभाळूनच खा. या खाण्याच्या सवयीमुळे २१ वर्षीय सौरभ मापुस्करला रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. रोजच्या जंक्स फूड खाण्याच्या सवयीमुळे त्याच्या हृदयात हळूहळू कोलेस्ट्रॉल जमा होऊन हृदय पूर्ण चोक झाले. ज्यामुळे त्याला इतक्या लहान वयात सर्जरीला सामोरं जावं लागलं आहे.
परेलमधील निवासी सौरभ मापुस्करला अचानक ११ मे रोजी घरी असताना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्याला उलट्या सुरु झाल्या. पाणी प्यायल्यानंतर बरं वाटेल असं वाटून पाणी प्यायला. मात्र रात्री परत त्याला तसाच त्रास झाल्यामुळे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्याला सकाळी हलवण्यात आले. काही टेस्ट केल्यानंतर त्याचे हृदय कोलेस्ट्रॉल आणि चरबीमुळे ब्लॉक झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या तीन मुख्य रक्तवाहिन्या या ब्लॉक असल्याचे पाहून डॉक्टरांनादेखील धक्का बसला.

- Advertisement -

यासंदर्भात ग्लोबल रुग्णालयाचे डॉ. झैनुताबेदीन हमदुलाय यांनी सांगितले की, ‘माझ्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत इतक्या लहान वयाच्या मुलाच्या तिन्ही रक्तवाहिन्या ब्लॉक असण्याची ही पहिलीच केस आहे. रोज सामोसा आणि चायनीज खाल्ल्यामुळे त्याच्या हृदयाच्या तिन्ही रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या होत्या. जेव्हा मी त्याचं हृदय उघडलं तेव्हा त्यामध्ये फक्त आणि फक्त कोलेस्ट्रॉल होतं.’
सौरभ घरातील जेवण सोडून रोज बाहेरचे पदार्थ खात होता. ज्याची भरपाई त्याच्या कुटुंबालादेखील करावी लागली आहे. तो ज्या अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला तेव्हा त्याची स्थिती अतिशय वाईट असल्याचेदेखील डॉक्टरांनी यावेळी नमूद केले. १६ मे रोजी त्याचे ऑपरेशन केले असून आता सौरभ बरा असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

जंक फूडमुळे नेमके काय होते?
– जंक फूड सतत खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि चरबीचे प्रमाण शरीरात वाढते.
– कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तदाब वाढतो.
– रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन हृदय ब्लॉक होते.
– श्वास घेण्यासाठी त्रास होतो.
– वजन झपाट्याने वाढते.
– चरबी अतिरिक्त प्रमाणात जमा झाल्यामुळे यकृतावर परिणाम होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -