Eco friendly bappa Competition
घर मुंबई Sanjay Nirupam : नालेसफाई कामात कोट्यवधींचा घोटाळा; कारवाईची मागणी

Sanjay Nirupam : नालेसफाई कामात कोट्यवधींचा घोटाळा; कारवाईची मागणी

Subscribe

 

मुंबई: पावसाळा तोंडावर आलेला असताना मुंबईत अद्यापही नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. पालिकेने यंदा नालेसफाई कामांवर तब्बल २२६ कोटी रुपये खर्च केले आहेत. या नालेसफाईच्या कामांत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी करून आयुक्त, कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्यात १० टक्के व पावसाळ्यानंतर १० टक्के अशी तीन टप्प्यात नालेसफाईची कामे करण्यात येतात. यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली. पालिकेने ३१ मे या मुदतीच्या एक आठवड्यापूर्वीच १०० टक्के पेक्षाही जास्त प्रमाणात नालेसफाई केली असून ९ लाख मेट्रिक टन पेक्षाही जास्त गाळ उचलला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

हेही वाचाःयंदाच्या पावसाळ्यात ५० हजार झाडे लावणार, पालिका उद्यान खात्याचा नवा संकल्प

- Advertisement -

मात्र माजी खा. संजय निरुपम यांनी, पालिकेचा नालेसफाई काम व गाळ काढल्याचा दावा हा केवळ कागदावरील असून प्रत्यक्षात नालेसफाईची कामे अद्यापही नीटपणे पूर्ण झालेली नाहीत. आपण स्वतः नालेसफाई कामांची पाहणी केली आहे. त्यामध्ये नालेसफाईची कामे नीटपणे झालेली नसून काही ठिकाणी नाले आजही भरलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. काही नागरिकांच्याही नालेसफाई कामांबाबत तक्रारी आल्या असल्याचा दावा माजी खासदार निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न

# मुंबईतील नालेसफाई कामांचे कंत्राट वर्षानुवर्षे ठराविक कंत्राटदारांनाच का दिले जाते?

# मुंबईत नालेसफाई नीटपणे न होण्याला जबाबदार कोण ?

# नालेसफाई नीटपणे झालेली नसल्याने त्यासाठी खर्चलेले २२६ कोटी रुपये गेले कुठे ?

# नालेसफाई कामाच्या अंतर्गत नाल्यांमधून एकूण किती गाळ काढला व टाकला कुठे ?

# यंदाच्या पावसाळ्यात मुंबई बुडाली तर जबाबदार कोण असणार ?

 

बिहारमधील पूल दुर्घटनेशी संबंधित ‘त्या’ कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करा- रवी राजा

bihar bridge collapse बिहार राज्यातील गंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाचे चार स्तंभ कोसळण्याची घटना नुकतीच घडली. या पुलाचे काम करणारा व मुंबईतील गोरेगाव – मुलुंड लिंक रोड अंतर्गत उन्नत मार्ग उभारणी, रत्नागिरी हॉटेल चौक व डॉ. हेडगेवार चौक येथे सहा पदरी पुलाची उभारणी आदी ६६६ कोटी रुपयांची कामे हाती घेतलेला कंत्राटदार मे.एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन हा एकच कंत्राटदार आहे. त्यामुळे बिहारमधील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबईतील कामांची झाडाझडती घ्यावी व चौकशी करावी. त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे व दुसरा चांगला कंत्राटदार नेमण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसतर्फे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे रवी राजा यांनी एक पत्र पाठवून वरीलप्रमाणे मागणी केली आहे. बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील गंगा नदीवर पुल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र गेल्याच आठवड्यात सदर पुलाचे उभारलेले चार स्तंभ कोसळून मोठी दुर्घटना घडली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र सदर दुर्घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

 

 

- Advertisment -