घरमुंबईहिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागावा, संजय राऊताचं चॅलेंज

हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागावा, संजय राऊताचं चॅलेंज

Subscribe

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसाबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलंय.

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसाबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलंय. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागावा, अन्यथा स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, असं आव्हानच संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना दिलंय.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे चॅलेंज दिलंय. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांच्याकडून वारंवार महापुरूषांचा अपमान होतो. चंद्रकांत पाटील टोपी फिरवतात आणि पलटी मारण्यालाही मर्यादा असतात. चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंचा अपमान होऊनही आम्हीच खरे शिवसैनिक असल्याचं सांगणारे, बाळासाहेब ठाकरेंचे आम्हीच खरे वारसदार म्हणणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान होऊनही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधा निषेधही केला नाही. हे कसले वारसदार आहेत? यांना कोण वारसदार म्हणणार?”

- Advertisement -

बाळासाहेबांचा अपमान करणारे आजही तुमच्यासोबत बसत असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने लाचार आणि मिंधे आहात. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असता कामा नये. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० आमदार भूमिका घेणार का? असा सवाल देखील यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला. बाळासाहेबांचा अपमान तुम्ही सहन करताय? बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले.

हिंमत असेल तर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा मागा. नसेल जमत तर स्वतः राजीनामा द्या आणि खरे शिवसैनिक असल्याचं सिद्ध करा, असं चॅलेंज यावेळी संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलंय.

- Advertisement -

तसंच सिल्वर ओक शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या बैठकीवर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय. मविआच्या भविष्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या बैठकीत अधिक तपशील देण्याचं संजय राऊतांनी टाळलंय.

महाविकास आघाडीतील समन्वयासाठी काँग्रेसचे केंद्रीय नेते के. सी, वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरेंची वेळ मागितली असल्याचं देखील यावेळी संजय राऊतांनी सांगितलं. महाविकास आघाडीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडे निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने अनेकदा कोंडी होते. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी के. सी. वेणूगोपाल मुंबईत येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परस्पर विरोधी घेतलेल्या भूमिकेमुळे मविआमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलं. यावर बोलताना मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हणत संजय राऊतांनी यावर सारवासारव केलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -