घरमुंबईव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीवर आवाज उठवल्यास देशद्रोही ठरवू नये - संजय राऊत

व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीवर आवाज उठवल्यास देशद्रोही ठरवू नये – संजय राऊत

Subscribe

देशातील प्रत्येकजण दडपणाखाली आहे.

देशात लोकांच्या मनात अनेक शंका संशयाला जागा आणि चर्चा सुरु आहे. प्रत्येकजण हा दडपणाखाली आहे आणि हे दडपण न बोलण्याचे आहे गप्प राहा अशा पद्धतीचे आहे. अभिनेत्री तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप आणि इतर दोघांवर आयकर विभागाने छापा टाकला याचा अर्थ सर्वच सिनेसृष्टीवर टाकलाय असे नाही. देशात जेव्हा जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाली तेव्हा अनेक कलाकारांनी त्याविरोधात आवाज उठवला आहे. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. या प्रकरणात कोणी आवाज उठवल्यास त्यांना देशद्रोही ठरवू नये असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरी टाकलेल्या आयकर विभागाच्या धाडसत्रावर प्रतिक्रीया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, या देशातील अनेकांच्या मनात शंका असून प्रत्येकजण दडपणाखाली आहे. हे दडपण न बोलण्याचे आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला याचा अर्थ असा नाही होत की संपूर्ण सिनेसृष्टीवर टाकला आहे. बॉलिवूडमध्ये अंडर्वल्डचा पैसा खळखळतो काळा पैसा खळखळतो अशा उलट सुलट चर्चा होत असतात या चर्चा चुकीच्या आहेत.

- Advertisement -

देशात ज्यांनी या फिल्म इंडस्ट्रीचा पाया रचला ते दादासाहेब फाळके आहेत. या उद्योगामध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टीला थारा असु नये. जेव्हा जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाली तेव्हा अनेकदा सीनेउद्योगातील अनेक प्रमुख व्यक्तींनी आवाज उठवला आहे. आता जर कोणी आवाज उठवला तर त्यांच्यावर कोणीही देशद्रोही ठरवू नये असे म्हणत संजय राऊत यांनी केंद्राला टोला लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -