घरमुंबईसांताक्रूझचा पादचारी पूल ३० नोव्हेंबरपर्यंत बंद, प्रवाशांचे हाल

सांताक्रूझचा पादचारी पूल ३० नोव्हेंबरपर्यंत बंद, प्रवाशांचे हाल

Subscribe

सांताक्रूझ पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महापालिकेचा पादचारी पूल मंगळवार पासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सांताक्रूझ स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

सांताक्रूझ पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महापालिकेचा पादचारी पूल बंद असल्या कारणाने ट्रेनमधून उतरल्यानंतर प्रवाशांना मधल्या ब्रीजवरुन फिरुन स्थानकाबाहेर पडावं लागत आहे. हा चर्चगेट दिशेचा पुल असल्यामुळे बोरीवली आणि चर्चगेट या दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडुन मोठ्या प्रमाणात या पूलाचा वापर व्हायचा. पण आता हा पूल बंद असल्यामुळे प्रवाशांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत पूल बंद

सांताक्रूझ पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महापालिकेचा पादचारी पूल ११ सप्टेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. या पुलाच्या डागडुजीचे काम पश्चिम रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ८० दिवस हा पूल बंद असणार आहे. दरम्यान, हा पूल बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना सांताक्रूझ स्थानकातील मिडल ब्रीज वापरण्याचं आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आलं आहे. दरम्यान सांताक्रूझ स्थानकातून रोज अनेक प्रवासी प्रवास करतात. हा ब्रीज बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

- Advertisement -

म्हणून आहे पूल बंद

दरम्यान मुंबईत मागील काही महिन्यात मुंबईत पूल पडण्याची संख्या वाढली आहे. अंधेरीचा पूल पडल्यानंतर सगळ्या मुंबईवासियांत भितीचे वातावरण होते. त्यामुळे त्यानंतर लोअर परळचा पूलाप्रमाणे बऱ्याच पूलाची काम करण्यासाठी पूल बंद करण्यात आले आहेत. या सांताक्रूझ स्थानकातील पूलाचे ही डागडुजीचे काम करण्याकरीता बंद करण्यात आली असून हे काम पश्चिम रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

वाचा – म्हणून कोसळला अंधेरी पूल…

प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण 

रोज या पुलावरून ये – जा करणाऱ्या प्रवाशांना या बंद पुलाची माहिती नसल्या कारणाने सध्या त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. हा पूल पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दिशेला जोडतो. त्यामुळे या पूलाचा दररोज बरेच प्रवासी उपयोग करतात. ज्यात शाळकरी विद्यार्थी, कामाला जाणारे लोकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या सर्वांचाच खोळंबा होताना दिसत आहे.

- Advertisement -

वांद्रे स्थानकाचा पादचारी पूल ही होणार बंद 

येत्या १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री वांद्रे स्थानकातील उत्तरेकडील पादचारी पूल देखील बंद करण्यात येणार आहे. त्याशिवाय, दक्षिणेकडच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वरील पायऱ्या ही बंद करण्यात येणार आहेत. १३ आणि १४ च्या मध्यरात्री हा पूल बंद असणार आहे. दरम्यान पूलाचा विस्तार करण्याकरीता पूल बंद करण्यात येणार असून १० मीटर रुंदीचा नवा पूल प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे, हा पूल बंद करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -