घरमुंबईइंटरनेटअभावी कर्जतमधील दुय्यम निबंधक कार्यालय ठप्प!

इंटरनेटअभावी कर्जतमधील दुय्यम निबंधक कार्यालय ठप्प!

Subscribe

दस्त नोंदीसाठी नागरिक प्रतीक्षेत

नेरळ येथील, तसेच कर्जत तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज तब्बल सहा महिन्यांपासून अनियमितपणे सुरू आहे. इंटरनेट अभावी दस्त नोंदणीचे काम खोळंबले आहे. परिणामी ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिकांना खोळंबून राहावे लागत आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे महसूल विभागाने यासंदर्भात लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या दोन्ही कार्यालयात दस्त नोंदणीकृत करण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र, सहा महिन्यांपासून कधी सर्व्हर डाऊन, तर कधी इंटरनेट नाही या कारणांनी काम ठप्प झाले आहे. नागरिकांना कामासाठी तासंतास खोळंबून राहावे लागत आहे. काही वेळेला दस्त नोंदीसाठी चक्क काही महिने वाट पाहावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. घराची खरेदी, जमीन मिळकत, फ्लॅट खरेदी-विक्री, हक्कसोड पत्र, याशिवाय जमीन व्यवहारात दस्त नोंदणी करणे हे महत्त्वाचे असते. यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. मात्र, सरकारी बीएसएनएलची इंटरनेट सेवा सरकारी कामातच अडथळा आणत असल्याने सर्वांचीच गैरसोय होत आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या खोदकामाचा फटका बीएसएनएलला बसत आहे. पनवेल, खालापूर, खोपोली या ठिकाणी महामार्गावर महानगर गॅस पाइपलाइनचे काम सुरू असून, त्यासाठी जेसीबी मशिनद्वारे मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेने टाकलेल्या बीएसएनएलच्या केबल बाधित होत असून, वारंवार इंटरनेटसेवा खंडित होत आहे.

कर्जत तालुक्यातील दोन्ही दस्त नोंदणी कार्यलयात इंटरनेट बंद असल्याने दस्त नोंदणी ठप्प झाली आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कसोड पत्राची नोंदणी खोळंबली आहे. जमिनीच्या 18 खातेधारकांना दरवेळी एकत्र करून कर्जत दुय्यय निबंधक कार्यालय गाठतो. मात्र, इंटरनेट बंद असल्यास रिकाम्या हाती फिरावे लागते. असे अनेकदा घडले आहे. यात वेळ आणि पैसा वाया जात आहे. -भरत खडेकर, शेतकरी, बोरगाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -