घरमुंबईशिवडीच्या नर्सने टीबीच्या रुग्णांना काढलं हॉस्पिटलच्याबाहेर

शिवडीच्या नर्सने टीबीच्या रुग्णांना काढलं हॉस्पिटलच्याबाहेर

Subscribe

मुंबई महापालिकेच्या शिवडी टीबी हॉस्पिटलमधून छोट्या टीबी रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसह हकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबई महापालिकेच्या शिवडी टीबी हॉस्पिटलमधून छोट्या टीबी रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसह हकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी माहिम दर्ग्याजवळ रुग्णालय प्रशासनाच्या एकूणच सिस्टीम विरोधात निदर्शने देत नाराजी व्यक्त केली. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या नर्स, स्टाफ यांच्या युनियनपुढे रुग्णालय प्रशासनही हतबल झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं.

रुग्णालयात सीसीटीव्ही ही नाही त्यामुळे वॉर्डमध्ये कोण काय करतं हे वरिष्ठांपर्यत पोहोचत नाही. नर्स‌ मिळून सीसीटीव्ही काढले आहेत.
– डॉ. अमर पवार, टीबी रुग्णालय

- Advertisement -

नर्स आणि सिस्टमची रुग्णांवर दादागिरी

गेल्या शुक्रवारपासून तील नर्स आणि स्टाफ मुलांना त्रास देत आहेत. त्यांना वेळेवर जेवण नाही, त्या मुलांची ड्रेसिंग नाही, अशा‌ अनेक तक्रारी या वेळेस या मुलांच्या पालकांनी केल्या आहेत. शिवाय नर्स मुलांसह पालकांना ही शिव्या देऊन बोलतात, असा ही आरोप पालकांनी केला आहे.

- Advertisement -

नर्सच्या जाचाला कंटाळून पल्लवी बाहेर पडली 

पल्लवी झसरे ही १२ वर्षीय मुलगी टीबीच्या उपचारांसाठी शिवडी टीबी रुग्णालयात दाखल झाली. गेले ४ महिने ती उपचार घेत आहे. तिच्यासोबत तिची आई लक्ष्मी झसरे या देखील होत्या.‌ नर्सच्या जाचाला कंटाळून पल्लवीला ऑक्सिजनसह रुग्णालयातून रविवारी घरी आणण्यात आलं.

२ वर्षांपासून पल्लवीला टीबी आहे. २०१६ ला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता तिला पुन्हा हा आजार उद्भवला. म्हणुन उपचारांसाठी इथे ४ महिन्यांपासून ती इथे आहे. गेल्या शुक्रवारपासून रुग्णालयातील नर्स आणि स्टाफ मुलांना त्रास देत आहेत. जेवण, दूध मागितलं तर शिव्या घालुन बोलत होते. रविवारी रात्री उशिरा पुन्हा भांडण झालं. त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथून जाण्यास सांगितलं. पण रात्री उशीर झाला होता. म्हणुन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. आणि काल रात्रीपासून माहिम दर्ग्याजवळ बसलो होतो. “

– लक्ष्मी झसरे, पल्लवीची आई

रुग्णांच्या पालकांमध्ये भीतीच सावट 

हॉस्पिटल्सच्या नर्सची पालकांमध्येही दहशत आहे. या हॉस्पिटलमधून पल्लवीसोबत आणखी ६ रुग्णांना हकलण्यात आलं आहे. येथे १५-१५ दिवस बेडशीटही मिळत नाहीत, असा आरोप पालकांनी केला आहे. रुग्णालयात मरणाचे इंजेक्शन देणार, असे पालक सांगतात. या ठिकाणी मुलांकरता स्वतंत्र वॉर्ड असून तो रात्री पूर्णपणे बंद करून टाकतात. अॅडमिशनच्या फाईल फेकून दिल्या जातात. रुग्णांना सिस्टर मारुन टाकतील, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. रुपाली पवार असे या नर्सचे नाव असून पालकांनी या ठिकाणी तक्रार बॉक्स लावण्याची तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -