घरमुंबई'उद्याचा बंद हा राजकीय बंद नाही'

‘उद्याचा बंद हा राजकीय बंद नाही’

Subscribe

नव्या कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘बळीराजा हा संकट काळातही शेतात राबत असतो. कोरोना दरम्यान आपण घरी असताना शेतकरी शेतात काम करत होता. आज त्याने आपल्याला साद घातली आहे. त्यामुळे आज आपण त्याच्या पाठिशी निश्चितपणे उभं राहिला हवं. तसेच त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने स्वतःहा या बंदमध्ये सहभागी व्हायला हवं.’ तसेच उद्याच्या ‘भारत बंद’मध्ये अनेक राजकीय पक्ष उतरले असले तरी हा कोणताही राजकीय बंद नाही. असेही त्यांनी यावेळी म्हटले.

तसेच, एखाद्या राजकीय पक्षाच्या, राज्याच्या संघटनेच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुकारलेला हा बंद नाही. तर देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा. यासह गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता हे आंदोलन शेतकरी करताय, आणि त्याला पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे. यासाठी शिवसेने आवाहन केले आहे की, स्वेच्छेने या बंदमध्ये सहभागी होऊन जनतेने आपली शेतकऱ्यांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

उद्या शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद

गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. ९ डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.


‘मुख्यमंत्री झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पुरेशी मदत नाही, शिवसेनेचं शेतकरी प्रेम नकली’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -