घरमुंबईमहापालिकेच्या राजशिष्टाचार अधिकाऱ्याला हटवण्याची शिवसेना नगरसेवकांची मागणी

महापालिकेच्या राजशिष्टाचार अधिकाऱ्याला हटवण्याची शिवसेना नगरसेवकांची मागणी

Subscribe

चीन दौऱ्यावरून राजशिष्टाचार अधिकारी मिलिंद कांबळे यांना राजशिष्टाचार विभागापासून दूर करून जनगणनेच्या कामासाठी वापरावे, असी मागणी करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभारी राजशिष्टाचार आणि संपर्क अधिकारी मिलिंद कांबळे यांची तडकाफडकी बदली करण्याची मागणी आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी केली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी नगरसेवकांची दिशाभूल करणार्‍या कांबळे यांना या राजशिष्टाचार खात्यापासून दूर ठेवत जनगणना किंवा निवडणूक कामांसाठी त्यांचा वापर करुन घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. महापौर, महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांना चीन येथील शांघाय आणि गुआंग झोऊ शहरातील महापौरांनी तेथील रुग्णालये, रस्ते आणि घनकचरा व्यवस्थापन पाहण्यासाठी निमंत्रित केले होते. यासाठी महापौरांसह इतर ३४ जणांन सहमती दर्शवली होती. परंतु प्रभारी राजशिष्टाचार आणि संपर्क अधिकारी मिलिंद कांबळे यांच्याकडून आधीच्या दौर्‍याचा अनुभव पाहता चीन दौर्‍याचे नियोजन त्यांना न देता त्याच विभागातील दुसर्‍या अधिकार्‍याला सोपवले होते.

‘कांबळेंचा उपयोग जनगणनेसाठी करा’

कांबळे यांच्याकडून नियोजन काढून घेतल्यामुळे त्यांनी नगरसेवकांमध्ये दौर्‍याबाबत नकारात्मक गोष्टी पसरविण्याचे काम सुरु केले. त्यानंतर काही नगरसेवकांनी अमेय घोले यांच्याकडे तक्रार करून, कांबळे हे चीन दौर्‍याबाबत गैरसमज पसरवून सगळ्याची दिशाभूल करत असल्याचे सांगितले. त्यामुळे या अधिकार्‍याची वागणूक पाहता त्यांना राजशिष्टाचार विभागात ठेवणे उचित नाही. स्वत:च्या फायद्यासाठी दिशाभूल करणार्‍या कांबळे यांना राजशिष्टाचार खात्यापासून दूर ठेवावे आणि त्यांच्या सेवेचा उपयोग जनगणना अथवा निवडणूक कामासाठी करून घ्यावा. अन्यथा हा अधिकारी हेतुपुरस्सर, पूर्वग्रह दूषित राजकीय वर्तुळात गैरसमज पसरवण्याची शक्यताही घोले यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात घोले यांनी ४ फेब्रुवारी रोजी आयुक्तांना निवेदन देऊन ही मागणी केल्यांनतर सामान्य प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांना याबाबत कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

राजशिष्टाचार आणि संपर्क अधिकारी असलेले कांबळे हे लोकप्रतिनिधींमध्ये गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळेच आपण त्यांची तक्रार आयुक्तांकडे केली आहे. त्यावर मी आजही ठाम आहे. मीच नाही तर सर्वच नगरसेवक त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.

अमेय घोले, शिवसेना नगरसेवक आणि आरोग्य समिती अध्यक्ष


हेही वाचा – नगरसेवकांचे सर्व अभ्यास दौरे रद्द; आदित्य ठाकरेंनी मारली काट!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -