घरताज्या घडामोडीमुंबई भाजपच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेचे आंदोलन

मुंबई भाजपच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेचे आंदोलन

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद हे संध्याकाळी मुंबईतही उमटले. शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग संकपाळ यांच्या अध्यक्षतेत आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी यावेळी कर्नाटक सरकार हाय हाय अशाही घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पडसाद हे देशभर उमटले. या प्रकरणात काही शिवसैनिकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

भाजप सरकारचा निषेध जितका करावा तितका कमी आहे. बंगळुरू येथे छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रतिसाद हे देशात उमटले. पण त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळाला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. यावेळी त्यांनी कर्नाटक भाजप सरकारविरोधात घोषणाही दिल्या. कानडी सरकार जर अशाच पद्धतीने वागणार असेल, तर महाराष्ट्रातूनही कर्नाटकला बसेस जातात हे त्यांनी लक्षात ठेवावे असेही पांडुरंग सकपाळ म्हणाले.

- Advertisement -

भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही शिवसैनिकांनी केलेल्या मोठ्या गर्दीमुळे एकच गोंधळ निर्माण झाला. शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात याठिकाणी घोषणा दिल्या. तसेच फलक आणि बॅनरसह कर्नाटक सरकारचा निषेध करताना शिवसैनिक यावेळी दिसले. आज दिवसभरात कर्नाटक सरकारच्या बसेसवर शिवसैनिकांनी काळा स्प्रे  वापरला. त्यासाठीही ९ शिवसैनिकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -