Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई धक्कादायक : चित्रपट प्रदर्शनापूर्वी मराठी लेखक - दिग्दर्शक स्वप्नील मयेकरचे निधन

धक्कादायक : चित्रपट प्रदर्शनापूर्वी मराठी लेखक – दिग्दर्शक स्वप्नील मयेकरचे निधन

Subscribe

मुंबई : लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर (Swapnil Mayekar) याचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ (Marathi Paul Padte Pudhe) हा चित्रपट उद्या (5 मे) प्रदर्शित होणार आहे. परंतु चित्रपट प्रदर्शनापूर्वीच तो काळाच्या पडद्याआड निघून गेला आहे. वयाच्या 46 व्या वर्षी स्वप्नील मयेकर यांने अखेरचा श्वास घेतला. स्वप्नील मयेकर गेल्या काही महिन्यापासून आजारी होता. त्याने आज पहाटे चेंबूर घाटलागाव येथे राहत्या घरी निधन झाले आहे.

स्वप्नील मयेकर याचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा स्वतंत्र लेखक-दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता.  त्याने ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल होते. परंतु त्यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सरी’तील ‘बदलली वाऱ्याने दिशा’ हे विरहगीत प्रदर्शित

स्वप्नील मयेकर यांचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याचे निधन झाल्यामुळे या चित्रपटाच्या टीमवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे स्वप्नील मयेकर यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

- Advertisement -

‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा एका धडाडी तरुण उद्योजकाची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. ऍक्शन, इमोशन्स आणि दर्जेदार डायलॉग्ज असलेला हा चित्रपट उद्या प्रेश्रकांच्या भेटीला येणार आहे. मराठी तरुणांनी उद्योगक्षेत्रात यावे यावर “मराठी पाऊल पडते पुढे” सिनेमाची कथा आहे. सिनेमातील “हाऊ पोऱ्या अनेर काठणा” हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. “हाऊ पोऱ्या अनेर काठणा” हे गाणं चिराग पाटीलवर चित्रित झाले आहे.

हेही वाचा – “सासूबाई जोरात” मध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट

- Advertisment -