घरUncategorized'एक विलन' या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी 'या' अभिनेत्रीचे नाव निश्चित

‘एक विलन’ या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी ‘या’ अभिनेत्रीचे नाव निश्चित

Subscribe

अभिनेत्री दिशा पटानी लवकरच 'एक विलन' या चित्रपटाच्या सिक्वेलमधून आपल्या समोर येणार आहे.

चित्रपट क्षेत्रातील ग्लॅमरस अॅक्ट्रेस असा ठसा उमटवणारी अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते. ती फक्त ग्लॅमरस नाही तर हुशारही आहे.तसेच तिचा चाहता वर्गही काही कमी नाही. अशातच ‘एक विलन’ या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी दिशा पटानीचे नाव निश्चित झाले आहे. दिग्दर्शक मोहित सूरी यांनी दिशाची या सिक्वेलसाठी निवड केली आहे.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

?#malang

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

- Advertisement -

 

नुकताच प्रदर्शित झालेल्या मलंग या चित्रपटातून ती समोर आली होती. ‘एक विलन’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिशासोबत आदित्य रॉय आणि जॉन अब्राहमसुद्धा दिसणार आहेत. हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या एक विलन या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख हे मुख्य भूमीकेत असणार आहेत. यादरम्यान दिग्दर्शक मोहीत म्हणाले, दिशा ही पहिली अभिनेत्री आहे जी माझ्याकडे आली आणि म्हणाली की, “मलाही मुलांप्रमाणे अभिनय करायचा आहे, स्टंट करायचे आहेत, लोकांना मारायचे आहे”. तसेच या चित्रपटामधील दिशाच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना मोहित म्हणाले, “नुकताच मलंगच्या रिलीजमध्ये ज्याप्रमाणे दिशाचा सर्वांगीण नवीन अवतार समोर आला, तसाच या चित्रपटातूनही आपला आगळा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तसेच दिशा लवकरच सलमान खानच्या राधे या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे ‘कैटीना’ नावाचाही चित्रपट आहे. बागी-३ मधीलही एका गाण्यात ती डान्स करताना दिसणार आहे.


हेही वाचा- Video: हनी सिंग इज कम बॅक; चाहत्यांसाठी खास पार्टी साँग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -