घरमुंबईसुंदर मी होणार! मुंबईत जागतिक दर्जाचे उद्यान

सुंदर मी होणार! मुंबईत जागतिक दर्जाचे उद्यान

Subscribe

मुंबई पोट्र ट्रस्ट मुंबईकरांच्या या समस्येला उत्तर शोधत असून मुंबईत नवे मोठे उद्यान बांधण्याच्या प्रकल्पाला बीपीटीने हिरवा कंदील दाखवला आहे. ‘सेंट्रल गार्डन’ असे या उद्यानाचे नाव असणार आहे.

मुंबईत मोकळी मैदाने आणि उद्याने ही तशी आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहेत. याविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या असल्या तरी मुंबईकर उद्यानांपासून तसे दूरच राहिले आहेत. मुंबईकरांची ही खंत आता लवकरच दूर होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) मुंबईकरांची ही चिंता दूर करणार आहे. मुंबईतील हाजी बंदर जवळ एक जागतिक दर्जाचे उद्यान उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच याची निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात येणार आहे. बीपीटीकडून तब्बल १४५ हेक्टर जागेवर हे उद्यान उभारले जाणार आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्ये म्हणजे, जगातील सर्वांत मोठ्या उद्यानापैकी हे एक उद्यान असणार आहे. यामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखीन एक सोनेरी तुरा खोवला जाणार आहे.  मुंबईत मैदाने आणि उद्याने नाहीशी होत असल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर येत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी उद्यानांचा प्रश्न हाती घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दादेखील बनविला होता. परंतु त्यानंतरही मुंबईला शोभेल असे मोठे उद्यान आकारास येण्यात अनेक अडचणींना येत होत्या. मात्र मुंबईकरांची उद्यानाची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

‘अर्बन फॉरेस्ट’ नवीन संकल्पना…

मुंबई पोट्र ट्रस्ट मुंबईकरांच्या या समस्येला उत्तर शोधत असून मुंबईत नवे मोठे उद्यान बांधण्याच्या प्रकल्पाला बीपीटीने हिरवा कंदील दाखवला आहे. ‘सेंट्रल गार्डन’ असे या उद्यानाचे नाव असणार आहे. या उद्यानासाठी तब्बल ५५२ कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे. या जागेवर मुंबईकरांसाठी थीम गार्डनची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मैदान, रनिंग ट्रॅक आणि स्पोर्टस फिल्डची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय या उद्यानात ‘अर्बन फॉरेस्ट’ ही नवसंकल्पना राबविण्यात येणार असून त्याबरोबरच सहलींसाठी विशेष सुविधा असणार आहे. इतर अनेक सोयी सुविधांनी हे उद्यान संपन्न असणार आहेत. तर रिक्लेमेशन गार्डनसारखा अनुभवही याठिकाणी मुंबईकरांना घेता येणार आहे.
 soon there will be World-class garden in Mumbai
उद्यानाचा आराखडा
या सेंट्रल गार्डनच्या वृत्ताला मुंबई पोर्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दुजोरा दिला आहे. या उद्यानासाठी नुकतीच निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर साधारण २०२२ पर्यंत हे उद्यान बांधून तयार केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. विशेष म्हणजे हे उद्यान जगातील सर्वात मोठ्या उद्यानांपैकी एक उद्यान असणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. प्राथमिक अहवालानुसार सुमारे १४५ हेक्टर जागा यासाठी निश्चित केली असून सीडब्ल्यूपीआरएसने यासंदर्भातील अहवालही दिला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तर या प्रकल्पासाठी पर्यावरण सल्लागारासाठी निविदा मागविण्यात आलेल्या असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -