घरमुंबईसांडपाण्यापासून होणार वीजनिर्मिती

सांडपाण्यापासून होणार वीजनिर्मिती

Subscribe

आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांचे विशेष संशोधन

मुंबईसह देशातील औद्यगिक संस्थांमधून सोडल्या जाणार्‍या सांडपाण्यातून अनेक छोट्या मोठ्या तलावांची विल्हेवाट लावल्याची घटना समोर आली असून, त्याचा फटका तेथे राहणार्‍या स्थानिक रहिवाशांना बसतो. मात्र, या स्थानिकांची ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी नवसंशोधन केले असून, या संशोधनाला थेट जागतिक दर्जाचे दुसरे क्रमांक जाहीर झाल्याने उभ्या देशाचे या संशोधनाकडे लक्ष लागून राहिले आहे. आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या जीएसपी इनविरो स्टार्टअप कंपनीच्या माध्यमातून त्यांनी या कारखान्यातून सोडल्या जाणार्‍या सांडपाण्यातून वीज निर्मिती करण्याचा अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे, या इंधनाच्या माध्यमातून जीएसपी इनविरो या टीमने चेन्नईच्या विल्लीवक्कम या तलावाला पुन्हा एकदा नवसंजीवनी दिल्याचा प्रकारही समोर आला आहे.

देशभरात कारखान्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी तयार होते. अनेक ठिकाणी हे सांडपाणी नजिकच्या तलावात किंवा इतर नैसर्गिक स्त्रोतात सोडण्यात येते. यामुळे येथील जलप्रदूषण समस्यांनी स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून देशभरात ही समस्या वाढत असून याची गंभीर दखल आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतली. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जीएसपी इनविरो ही स्टार्ट अप कंपनी सुरू करून यावर संशोधन सुरू केले. या संशोधनातून त्यांनी एक मायक्रोबायल इंधन तयार केले असून या इंधनाच्या वापरातून कारखान्यातून सोडला जाणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे सहज सोपे असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, या संशोधनास नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड ग्रीन बिझनेस स्पर्धेत दुसरे पारितोषिक देखील मिळाले आहे. या संशोधनानुसार मायक्रोबायल इंधनाचा वापर करून कारखान्यातून सोडल्या जाणार्‍या सांडपाण्यातून वीज निर्मिती केली जात आहे. यासाठी युरोपच्या कंपनीकडून विशेष निधी देखील प्राप्त झाले आहेत.

- Advertisement -

अशी होते वीज निर्मिती
या संशोधनानुसार सांडपाण्यातील कार्बन कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यानुसार एनर्जी पॉझेटिव्ह ट्रिटमेंट टेक्नॉलॉजी तयार करण्यात आली आहे. यानुसार सांडपाण्यातील मायक्रोग्रेनिझीम कमी केले जाते. जे वीजनिर्मितीसाठी उपयुक्त असते. त्यानंतर या सांडपाण्याचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते. यासाठी एक विशेष मशीन्स तयार करण्याचे काम सुरू झाले असून २०२० पर्यंत ही मशीन्स तयार केली जाणार आहे. ही एक इको फ्रेंडली मशीन असल्याचा दावा ही या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

मायक्रोबायल इंधन वापरून हे तंत्रज्ञान विकासित करण्यात आले आहे. या इंधनाचा वापर करून कारखान्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्यातील विषारी पदार्थ कमी केले जातात. सध्या आमचे यात अजून संशोधन सुरू असून यातून जास्तीत जास्त वीज निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. या संशोनाच्या माध्यमातून वीज निर्मिती क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. – डॉ. व्ही.टी. फिदाल कुमार, माजी विद्यार्थी, आयआयटी मद्रास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -