घरताज्या घडामोडीचीनप्रमाणे मुंबईतही जंतूनाशक फवारणी

चीनप्रमाणे मुंबईतही जंतूनाशक फवारणी

Subscribe

चीनमध्ये ज्याप्रमाणे जंतूनाशक फवारणी करण्यात आली. त्याप्रमाणे आता मुंबईतही केली जाणार आहे.

करोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगरसेवक आणि आमदार आपल्या विभागांमध्ये जंतूनाशक फवारणी करत परिसर निजंर्तुंकीकरण करत असतानाच अंधेरी येथील काँग्रेसचे नगरसेवक जगदीश अमीन कुट्टी यांनी चायनाला वापरल्या जाणाऱ्या फवारणी यंत्राचा वापर करत विभाग जंतूनाशक फवारणीच कार्य हाती घेतले आहे. चायनामध्ये ज्या यंत्राचा वापर करत रस्ते आणि आसपासच्या इमारतींमध्ये फवारणी करत निजंर्तुंकीकरण केले जाते, त्याचप्रमाणे कुट्टी यांनी आपल्या मरोळमधील प्रभाग क्रमांक ८२ बरोबरच संपूर्ण के-पूर्व विभागात या यंत्राचा वापर करत फवारणी करण्याचा निर्धार केला आहे.

अंधेरी परिसरात निजंर्तुंकीकरण

करोनाच्या विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने सोडियम क्लोराईड पाण्यात मिसळून त्याद्वारे महापालिका रुग्णालय, मंडई तसेच महापालिका विभागीय कार्यालयांमध्ये फवारणी करत आहेत. त्यानुसार काही नगरसेवकांनी आपल्या विभागांमध्ये अशाप्रकारच्या फवारणी यंत्रांची खरेदी करत त्याद्वारे फवारणी करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांचे नगरसेवक अशाप्रकारच्या माध्यमातून विभागांमध्ये जंतूनाशक फवारणी करत आहेत. मात्र, काँग्रेसचे मरोळ येथील प्रभाग क्रमांक ८२चे नगरसेवक जगदीश अमिन कुट्टी यांनी आस्पो कंपनीची भारतीय बनावटीच्या मोठ्या फवारणी यंत्रांची खरेदी केली. हे यंत्र टेम्पोमध्ये ठेवून त्यातून फवारणीचे काम केले जाते. या फवारणीमधून रस्त्यांच्या प्रत्येक भागांमध्ये जंतूनाशक पसरले जातेच, शिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत ही फवारणी होऊन प्रत्येक खिडक्यांच्या लोखंडी ग्रीलचेही निजंर्तुंकीकरण केले जाते. अशाप्रकारच्या फवारणी यंत्राचा वापर चिनमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळे तशाच प्रकारच्या फवारणी यंत्र आपण घेऊन माझ्या प्रभागासह इतर प्रभागांमध्ये तसेच पर्यायाने के-पूर्व महापालिका विभाग कार्यालयाच्या संपूर्ण हद्दीमध्ये या यंत्राद्वारे फवारणी करण्यात येणार असल्याचे कुट्टी यांनी सांगितले. आतापर्यंत नगरसेवकांनी घेतलेल्या सर्व फवारणी यंत्रांच्या तुलनेत हे फवारणी यंत्र अत्याधुनिक पध्दतीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नगरचा तिसरा करोनाबाधितही परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -