घरमुंबईमुलुंड डम्पिंग बंद करण्यास स्थायी समितीची मंजुरी

मुलुंड डम्पिंग बंद करण्यास स्थायी समितीची मंजुरी

Subscribe

मुंबईमधील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी गेले कित्तेक वर्षे नागरिकांकडून केली जात होती. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड शात्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

पालिकेकडून ७३१ कोटींची तरतूद

मुंबईमधील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी १९७० ते २०१७ या कालावधीत विविध सल्लागारांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्यापैकी एकही प्रयोग यशस्वी झालेला नाही. असा अनुभव पालिका प्रशासनाला असताना मुलुंड डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे. मुलुंडच्या डम्पिंगवर आतापर्यंत ७० लाख मेट्रिक टन कचरा टाकण्यात आला असून त्या कचऱ्याची उंची ३० मीटरपर्यंत पोहोचली आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी २०१५ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०१६ मध्ये दुसऱ्यांदा आणि २०१७ मध्ये तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्या. मात्र, प्रतिसाद दिलेल्या कंत्राटदारांकडे अद्ययावत तंत्रज्ञान नसल्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा निविदा काढण्यात आल्या. त्यात मे. एस २ इन्फोटेक इंटरनॅशनल, मे. प्रकाश कॉन्स्ट्रोवेल लि. आणि मे. ई. बी. एन्व्हायरो यांना एकत्रित काम देऊन त्यासाठी ७३१ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

- Advertisement -

हा प्रस्ताव पथदर्शी प्रकल्प आहे. मुलुंड डम्पिंग बंद करण्यासाठी पालिका दरवर्षी १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग याच पद्धतीने बंद करणे सोपे जाणार आहे. डम्पिंगमधील कचरा काही खासगी लोकांच्या जमिनीवर कोसळला आहे. त्याठिकाणचा कचरा त्वरित साफ करून खासगी मालकांना या जमिनी कशा परत मिळतील याकडे पालिकेने लक्ष देण्याची मागणी करत प्रस्ताव मंजूर करावा- प्रभाकर शिंदे

डम्पिंग होणे गरजेचे आहे. त्यासाठी हा प्रस्ताव चांगला असल्याने त्याला मंजूर करावे – रवि राजा, विरोधी पक्षनेते

- Advertisement -

सदस्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्याचे निर्देश देत प्रस्तावाला मंजुरी दिली. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या प्रस्तावाला पालिका सभागृहाची मंजुरी मिळताच याची अंमलबजावणी केली जाणार आहे- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

असा असेल प्रकल्प

मुलुंडच्या डम्पिंगचे क्षेत्र २४ हेक्टर असून तेथे १९६७ पासून कचरा टाकला जात आहे. शहरातून दररोज साडेसात हजार टन कचरा जमा होतो त्यापैकी दीड हजार ते दोन हजार टन कचरा या डम्पिंगमध्ये टाकला जातो. आतापर्यंत ७० लाख मॅट्रिकटन कचरा टाकण्यात आला असून त्या कचऱ्याची उंची ३० मीटपर्यंत पोहोचली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पहिल्या वर्षी प्रकल्पाची बांधणी व उभारणी केली जाणार आहे. दुसèया वर्षी ११ लाख टन कचऱ्यावर, तिसऱ्या वर्षी २४ लाख टन, चौथ्या वर्षी ३८ लाख टन, पाचव्या वर्षी ५३ लाख टन तर सहाव्या वर्षी ७० लाख टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाणार आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावताना कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवले जाणार आहे. त्यातून उरलेले मेटल लाकूड यांचा पुनर्वापर केला जाणार असून राहिलेली माती भरणी कामासाठी वापरली जाणार आहे. सहा वर्षात डम्पिंगच्या जागी चांगले उद्यान उभारले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -