घरमुंबईसुशीला महाराव यांचे निधन

सुशीला महाराव यांचे निधन

Subscribe

समाजातील विविध स्तरांतून सुशीला महाराव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार, चित्रलेखाचे (मराठी) संपादक व नाट्य निर्माता संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव यांच्या मातोश्री सुशीला रामकृष्ण महाराव यांचे रविवारी दुपारी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. शनिवारी संध्याकाळी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी दुपारी ३ वाजता सुशीला महाराव यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजीपार्क विद्युतदाहिनीत रविवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे आहेत.

१९४८ मध्ये मुंबई महापालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या. १९८५ मध्ये सुशीला महाराव मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या .या ३७ वर्षांत सामाजिक जाणिवेतून हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनींना घडविले. त्यांना प्रतिकूल परिस्थितीत हिमतीने उभे राहण्याचे बळ दिले. त्यानंतरही सामाजिक जाणिवेनी जमेल तशी गरजूंना मदत करीत राहिल्या. आपल्या मुलांमध्येही सामाजिक जाणिवा रुजवल्या. कणखर, परखड आणि प्रगतिशील विचारांचा कायम आग्रह धरणारे प्रेरणादायी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. चार वर्षांपूर्वी माझी गोष्ट ह्या पुस्तकातून त्यांनी त्यांचा जीवनप्रवास मांडला होता. समाजातील विविध स्तरांतून सुशीला महाराव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा : आईने ‘माझी गोष्ट’ पूर्ण केली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -