घरताज्या घडामोडीOmicron Variant: धारावीवर ओमिक्रॉनचं सावटं; आफ्रिकेतील टांझानियातून परतलेल्या व्यक्तीचे जिनोम सिक्वेंसिंगचे अहवाल...

Omicron Variant: धारावीवर ओमिक्रॉनचं सावटं; आफ्रिकेतील टांझानियातून परतलेल्या व्यक्तीचे जिनोम सिक्वेंसिंगचे अहवाल प्रतिक्षेत

Subscribe

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीवर आता ओमिक्रॉनचं सावटं आहे. सर्वात दाट लोकवस्ती असलेली ही धारावी कोरोनामुक्त झाली होती. या धारावी मॉडेलचे जगभरातून कौतुक करण्यात आले होते. मात्र आता धारावीवर ओमिक्रॉनची सावटं आलं आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून धारावीत परतलेला व्यक्ती कोरोनाबाधित आढळला आहेत. त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी कस्तुरबा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. यामुळे आता मुंबईकरांची धाकधाकू वाढली आहे.

याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘टांझानियातून परतलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्याचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे.’ दरम्यान टांझानियातून धारावीत आलेला हा व्यक्ती ४९ वर्षीय आहे.

- Advertisement -

काल, शनिवारी राज्यात ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन असल्याचा अहवाल आला. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नव्हती. कल्याण डोंबिवलीतील या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या १२ अति जोखमीच्या निकट आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: देशात ओमिक्रॉन रुग्णांची वाढ; राजधानी दिल्लीत आढळला पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -