घरमुंबईदेशभरात ७०० इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स

देशभरात ७०० इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स

Subscribe

ताज हॉटेल्स, मॉल्स आणि घरांसाठी सुविधा

टाटा पॉवरकडून संपुर्ण देशभरात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क येत्या वर्षभऱात उभारण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणे तसेच घरांसाठी हे नेटवर्क उभारण्यात येणार आहे. संपुर्ण देशात जवळपास ७०० इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे टाटा पॉवरने स्पष्ट केले आहे. कंपनीकडून सध्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा विविध ठिकाणी शोध सुरू आहे असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी, शॉपिंग मॉल्सच्या ठिकाणी, थिएटर्स आणि हायवे यासारख्या सार्वजनिक ठिकाणी हे इव्ही स्टेशन उभारण्यात येणार आहेत. टाटा पॉवरच्या मालकीचे रिटेल आऊटलेट्स क्रोमा, वेस्टसाईड आणि टायटन तसेच ताज हॉटेल्सची चैनची जागा या इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसाठी वापरण्यात येणार आहे.

- Advertisement -

टाटा पॉवरने याआधीच विविध मेट्रो प्राधिकरणांसोबत बोलणी सुरू केली आहे. तसेच महापालिकांशीही या विषयावर चर्चा करण्यात येत असल्याचे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले. टाटा पॉवर ईव्ही स्टेशन उभारणीसाठी याआधीच हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, इंद्रप्रस्थ गॅस यासारख्या कंपन्यांसोबत सामंजस्याचा करार केला आहे. घरगुती चार्चिंग स्टेशनही कंपनीकडून पुरवण्यात येणार आहे.

मुंबईत २०० चार्जिंग स्टेशन

- Advertisement -

टाटा पॉवरने आतापर्यंत मुंबईत ३० ईव्ही चार्चिंग स्टेशन उभाारण्यात आली आहेत. मुंबईत २०२१ अखेरीस २०० पर्यंत चार्जिंग स्टेशन उभारण्याचे उदिष्ट टाटा पॉवरने ठेवले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलची मागणी गेल्या काही दिवसात वाढलेली आहे. सरासरी ३० ते ५० किलोवॉट क्षमतेची चार्जिंग स्टेशन उभारण्यावर आमचा भर असेल असे टाटा पॉवरने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -